Isis प्रकरणातील आरोपीला 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजारांचा दंड, NIA च्या विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा
Parbhani News : 2016 साली isis या जिहादी संघटनेशी संबंधित प्रकरणात परभणीतील नासेरबिन अबुबकर याफईस या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याला आज सात वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
![Isis प्रकरणातील आरोपीला 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजारांचा दंड, NIA च्या विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा Parbhani News Update Accused in Isis case sentenced to 7 years hard labor and Rs 5000 fine sentenced by NIA special court Isis प्रकरणातील आरोपीला 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजारांचा दंड, NIA च्या विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/9fa9bc6d5f3b7bb4819f6244ab30aa4e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parbhani News Update : आयसीस ( Isis ) प्रकरणातील आरोपीला सात वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नासेरबिन अबुबकर याफईस असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून तो मुळचा परभणीतील राहणारा आहे.
2016 साली isis या जिहादी संघटनेशी संबंधित प्रकरणात परभणीतील नासेरबिन अबुबकर याफईस या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर खटला सुरू होता. आज NIA च्या विशेष न्यायालयाने निकाल देत त्याला सात वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
14 जुलै 2016 रोजी मुंबई एटीएसच्या पथकाकडून परभणीतील देशमुख गल्ली भागातून नासेर बिन अबुबकर याफई याला isis चा कमांडर फारुख याच्याशी संबध असल्यावरून व त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर सहा वर्षांनी या प्रकरणात NIA च्या विशेष न्यायालयाने निकाल दिला.
नासेर बिन अबुबकर याफई याला कलम 13, 16, 18, 18-बी, 20, 38 अन्वये दोषी ठरवत UAP कायद्याचे 39, IPC चे कलम 120-B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 चे कलम 4, 5 अन्वये शिक्षा सुनावण्यात आली.
याफई हा इस्लामिक स्टेट/ISIL/ ISIS च्या सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या जिहादी कारवायांचे समर्थन करण्यासाठी ऑनलाइन संसाधने वापरत असल्याचे आढळून आले आहे. हा गुन्हा 14 जूलै 2016 रोजी नोंदवण्यात आला होता. तपासानंतर 7 ऑक्टोंबर 2016 रोजी चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींविरुद्ध पुढील खटला सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
Dombivli : पाणी टंचाईने घेतला जीव! डोंबिवलीत खदानीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
Beed : माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार; पोलिसांना आव्हान देत केला खून
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)