एक्स्प्लोर

शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात कोसळले, प्रसंगावधानामुळे वाचले सहा जणांचे प्राण, परभणीतील घटना

पुल नसल्याने शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात कोसळले. परभणीमधील पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगावमध्ये ही घटना घडली.या घटनेत प्रसंगावधानामुळे सहा जणांचे प्राण वाचले. ज्यात 2 लहान मुलांचा समावेश आहे.

परभणी : ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी जोडणारे रस्ते, नदी नाल्यांवरील पुल झालेले नाहीत. यामुळे दर वर्षी अनेकांना आपला जीव गावावा लागतो. अशीच घटना आज पुन्हा परभणीच्या पाथरी तालुक्यात घडलीय. चाटे पिंपळगाव-बाभळगाव मार्गावरील पुल झालेला नाही. त्यामुळे सध्या इथे जायकवाडीच्या कालव्याचे पाणी साचलेले आहे. यातून मार्ग काढणारे शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात पाण्यात कोसळले. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि 6 जणांचे जीव वाचवले आहे.ज्यात 2 लहान मुलांचा समावेश आहे.

पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव ते बाभळगाव रस्त्यावर चाटे पिंपळगाव जवळ पूल आहे. या पुलाचे काम झाले नसल्याने रेणापूर गावाकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी चाटे पिंपळगावच्या पुलाला येते सध्या जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्याचे पाणी या पुलाला आले आहे. त्यामुळे चाटेपिंपळगावच्या शेतकऱ्यांना याच पाण्यातून मार्ग काढूण शेतात जावे लागते.

चाटे पिंपळगाव येथील शेतकरी सखाराम पारटकर हे आपला मुलगा, सून आणि नातवांना घेऊन शेताकडे बैलगाडीतून निघाले होते. चाटे पिंपळगाव-बाभळगाव रस्त्यावरील पुलावर गाडी घातली मात्र पुलाचा रस्ता खराब असल्याने पुलावरील गाडी बैलांसह सर्वच कुटुंब पाण्यात पडले. त्यांचा आरडाओरडा ऐकून या रस्त्याने जाणारे शेतकरी हनुमान बोबडे व ज्ञानेश्वर काळे यांनी पाण्यात उडी घेऊन सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर गावातील इतर मंडळी मोठ्या प्रमाणावर जमा झाली व पाण्यात बुडालेली बैल गाडी बाहेर काढली.

या शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानतेने शेतकरी सखाराम पारटकर, त्यांचा मुलगा आसाराम पारटकर, सुन गीता आसाराम पारटकर, नात अपुर्वा आसाराम पारटकर 5 वर्षे व अनन्या आसाराम पारडकर 3 वर्षे या सर्वांचे प्राण इथे वाचले. मागच्या वर्षी ही अशाच प्रकारे इथे बैलगाडी वाहून गेली होती ज्यात बैलजोडीच्या मृत्यू झाला होता. त्यामुळे हा पुल तात्काळ करून देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केलीय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kagal Vidhan Sabha : हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
Madha : माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
Pune Crime: 32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anath Nathe Ambe:अनाथनाथे अंबे: ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा कालिमातेचा 08 Oct 2024Nana Patole PC FULL : 11 तारखेला मविआ पत्रकार परिषद घेणार : नाना पटोलेSanjay Raut PC Mumbai : ... तरी भाजपने अत्यंत महत्त्वाचं काश्मीर हे राज्य गमावलं : संजय राऊतABP Majha Headlines : 1 PM : 09 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagal Vidhan Sabha : हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
Madha : माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
Pune Crime: 32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
Solapur Accident : सोलापुरात टोल न देता बॅरिकेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडले, घटना कॅमेऱ्यात कैद
सोलापुरात टोल न देता बॅरिकेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडले, घटना कॅमेऱ्यात कैद
मोठी बातमी! आणखी एका नेत्याने अजितदादांची साथ सोडली, शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग
मोठी बातमी! आणखी एका नेत्याने अजितदादांची साथ सोडली, शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग
काँग्रेसचा बडा नेता वंचितच्या गळाला; आंबेडकरांकडून उमेदवारीची घोषणा, 10 मतदारसंघात मुस्लिमांना संधी
काँग्रेसचा बडा नेता वंचितच्या गळाला; आंबेडकरांकडून उमेदवारीची घोषणा, 10 मतदारसंघात मुस्लिमांना संधी
Dhananjay Mahadik on Rajesh Kshirsagar : तर आमची 80 हजार मते आहेत; खासदार धनंजय महाडिकांचे राजेश क्षीरसागरांना जोरदार प्रत्युत्तर!
तर आमची 80 हजार मते आहेत; खासदार धनंजय महाडिकांचे राजेश क्षीरसागरांना जोरदार प्रत्युत्तर!
Embed widget