Paramvir Singh | परमवीर सिंह हे भाजपचे डार्लिंग आहेत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची टीका
परमबीर सिंह (Paramvir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) हे जवळचे मित्र असल्याचं सांगत परमबीरांची NIA ने साधी चौकशीही केली नाही असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
कोल्हापूर : परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग आहेत अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी परमबीर सिंह आणि भाजपवर केली आहे. भाजपचे जिंदल काय बंडल यांनी पवार साहेब यांच्यावर टीका केली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असंही हसन मुश्रीफ म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपने या विषयावर तात्काळ माफी मागावी नाहीतर आमच्याकडूनही अशी वक्तव्य करण्यात येतील असं मुश्रीफ म्हणाले. लाज वाटत नाही का या जिंदालला पवार साहेब यांच्यावर बोलायला. दोन दिवसात माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी जशास तसे उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुश्रीफ म्हणाले की, मोदी आणि शाह एका महिलेला हरवण्यासाठी मागे लागले आहेत.
परमरबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार होते असं सांगत मुश्रीफ म्हणाले की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे जवळचे मित्र आहेत. आता देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत, ते का आता बोलत नाहीत
परमबीर सिंह यांची एनआयएने साधी चौकशी देखील केली नाही असा आरोप करत त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली.
परमबीर सिंहानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात तशी एक याचिका दाखल केली आहे. तर अँटिलिया स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात एनआयएकडून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एनआयए कित्येक दिवसांपासून एका ऑडी कारच्या शोधात होती आणि शेवटी त्या कारचा सुगावा एनआयएला लागला आहे. ही गाडी वसई भागात कुठेतरी असल्याची माहिती एनआयएला मिळाली, त्यानंतर एनआयएच्या पथकाने वसई आणि आसपासच्या भागात त्या गाडीचा शोध सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Lockdown Updated: महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता
- चंद्रपुरचा पारा 43.3 अंशांवर, चंद्रपूर जगातील चौथ्या क्रमांकाचे उष्ण शहर
- Sachin Tendulkar Hospitalized : सचिन तेंडुलकर उपचारासाठी रुग्णालयात दाखल, काही दिवसांपूर्वी झाले होते कोरोनाचे निदान