एक्स्प्लोर

'गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्यामागे पवार, ठाकरे', परमबीर सिंहांचा गौप्यस्फोट

अनिल देशमुखांपुरते हे प्रकरण मर्यादित नव्हते त्याचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत आहेत. योग्य वेळी सत्य समोर यईल, असा आरोप परमबीर सिंहांनी केला आहे.

मुंबई :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi)  नेत्यांवर केलेल्या खळबळजनक आरोप केले आहेत.  महाविकास आघाडीच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांचा (Anil Deshmukh)  दबाव होता असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे,  अनिल देशमुखांच्या पाठीशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे होते असा दावाही परमबीर सिंह यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. तसेच  जयंत पाटलांनी सांगलीतल्या विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितलं, असे देखील परमबीर सिंह म्हणाले. 

महाविकास आघाडीच्य काळात विरोधी नेत्यांना अडकवण्यासाठी दबाव होता. विरोधकांवर  गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख होते.  पण त्यांच्यामागे पवार, ठाकरे होते.   गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती.  तर मुंबई बँक प्रकरणात प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती असा खळबळजनक गौप्यस्फोट परमबीर सिंह यांनी केलाय.  सांगली जिल्ह्यातलं एक उदाहरण देत परमबीर सिंह यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावरही मोठे आरोप केले आहेत..

जयंत पाटलांनी सांगलीतल्या विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितलं : परमबीर सिंह

राजकीय विरोधकांवर कारवाईसाठी दबाव आणला जात होता.   गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला गेला होता.  अनिल गोटे, चव्हाण, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत त्यांनी  माझ्यावर दबाव आणला, मी नकार दिला.  2020 मधील हा प्रकार आहे. जयंत पाटील यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील विरोधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.  प्रविण दरेकर यांच्यावर देखील   कारवाईसाठी दबाव होता. परंतु   मी राजकारणासाठी पोलिस विभागाचा वापर होऊ दिला नाही. ठाण्यात माझ्या विरोधात बोगस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.  त्या केसमध्ये फडणवीस आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला, असे परमबीर सिंह म्हणाले. 

प्रकरणाचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत : परमबीर सिंह

 चांदिवाल कमिशनचा रिपोर्ट सबमिट झाला तेव्हा महाविकासआघाडीचे सरकार होते त्यात काय आहे हे त्यांना जास्त माहीत असेल. माझ्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत.  गरज भासल्यास योग्य वेळी समोर आणेन.  हे प्रकरण अनिल देशमुखांपुरते मर्यादित नव्हते त्याचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत आहेत. योग्य वेळी सत्य समोर यईल.  सुशांत सिंह राजपूत प्रकरणी फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यासाठी  देशमुख यांनी सांगितलं होतं.

अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करण्यात उद्धव ठाकरेंना रस नव्हता : परमबीर सिंह

अनिल देशमुखांचे आरोप बोगस आहेत. त्यांच्या मानसिक स्थितीची चिंता वाटते. तणावातून  ते असे आरोप करत आहेत.   सलिल देशमुख यांचा माझ्या संदर्भातील व्हिडीओ बघितला.  त्यात असभ्य भाषेचा वापर होता. मी कायम त्यांच्याविषयी आदरानेच बोलतो.  मी केलेले  100  कोटींचे आरोप अगदी खरे होते. त्यांचा मुलगा ललित हॉटेलमध्ये बसवून अवैध धंदेवाल्यांसोबत बैठक घ्यायचे हा प्रकार लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे, जयंत पाटील, पवार यांच्या समोर मांडला होता. त्यांना कारवाईत रस नव्हता. त्यांना या प्रकरणाची माहिती होती,  असं जाणवलं.

माझ्याकडे असलेले पुरावे ईडी, सीबीआयकडे दिले आहेत :परमबीर सिंह

उद्धव ठाकरेंना दोन- तीनदा वर्षावर भेटलो. पवारांना सिल्वर ओकवर  भेटलो. त्यांनी ऐकून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.  माझ्याकडे असलेले पुरावे पत्र लिहलं तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहेत. जुलै 2020 मध्ये मी मेरीटनुसार डीसीपींची बदली केली गेली होती. मात्र त्यावर स्टे लावण्यात आला नंतर त्यातील काही अधिकाऱ्यांची पुन्हा पोस्टींग करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून  पैसे काढण्यासाठी  हा प्रकार केला गेला. माझ्याकडे असलेले पुरावे ईडी, सीबीआयकडे दिले आहेत. ललितमध्ये बसून सलिल देशमुख  कुंदन शिंदे आणि एजन्टसह एकत्र डिलींग करत होते.

हे ही वाचा :

फडणवीसांनी पाठवलं नव्हतं, अनिल देशमुखांनीच बोलावलं होतं; ईडी प्रकरणात 'निरोप्या'चा आरोप असलेले समित कदम काय म्हणाले?

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रि‍पद, रस्सीखेच सुरुच?Zero Hour Jammu Kashmir : जम्मू - काश्मीरमध्ये 370 वरुन घमासान, मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल!Zero Hour Bachchu Kadu Parivartan : बच्चू कडू यांचं 'परिवर्तन'! शिंदेंची साथ सोडत तिसऱ्या आघाडीत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
Embed widget