Paper Leak Racket : पेपर फुटी प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेचे आवाहन, फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे!
आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेत गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
Paper Leak Racket : पुणे : आरोग्य पेपर फुटी, महाडा पेपर फुटी (Paper Leak) आणि आता टीईटी परीक्षेत (TET Exam) झालेल्या गैरव्यवहाराचा तपास पुणे सायबर पोलीस ठाण्याचे 70 कर्मचारी करत आहेत. यामध्ये वीस अधिकारी आहेत. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, अशांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
पुणे सायबर पोलिसांसोबत युनिट वन आणि युनिट फोरचे अधिकारी देखील आता या पेपर फुटी प्रकरणी तपास करणार आहेत. यासोबतच आरोपींनी टीईटीच्या परीक्षेचा पेपर देण्याच्या आमिषाने अनेकांकडून पैसे घेतले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्यांनी समोर यावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
म्हाडाचा पेपर फुटला त्या दिवशी रात्रीपर्यंत प्रीतिष देशमुखच्या मोबाईलवर अनेकांचे फोन येत होते. त्यामुळे पोलिसांकडे अनेकांचे नंबर आहेत. या सर्वांना देखील आता चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.
पुणे सायबर पोलीस दलात आता जेवढे मनुष्यबळ आहे ते या पेपर फुटी प्रकरणाच्या तपासासाठी कमी पडत होते. त्यामुळे पुणे पोलीस दलातील युनिट वन आणि युनिट फोरच्या टीम देखील या पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात सायबर पोलिसांना मदत करणार आहेत.
तीन पेरप फुटले
आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलीय.
पेपर फुटीचं ग्रहण थांबणार कधी?
दरम्यान, आधी आरोग्य, त्यानंतर म्हाडा आणि आता टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या पेपर फुटीच्या सत्रांमध्ये वाढच होत आहे. पोलिसांसमोर तर आरोपींना पकडण्याचे आव्हान आहेच. परंतु, ज्या विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष या परीक्षेसाठी मेहनत केली आहे. अशा विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय त्यांना मनस्तापालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा घटनांना आवर घालण्याची गरज असून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांमधून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : ज्यांनी पेपर फोडला, ते अजून फुटले नाहीत, म्हणून पेपर वारंवार फुटतो : राज ठाकरे