एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा, पंकजा मुंडे काय बोलणार?
भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करुन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याची नवी परंपरा सुरुवात केली आहे.
बीड : यंदाही भगवान गडावर दसरा मेळावा होणार नाही किंवा भगवानगडाच्या पायथ्याशीही होणार नाही. तर यंदाचा दसरा मेळावा भगवानगडापासून 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावरगाव घाटमध्ये पार पडणार आहे.
भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करुन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याची नवी परंपरा सुरुवात केली आहे. यंदाचा दसरा मेळावा भगवानबाबांची जन्मभूमी सावरगाव घाट इथे होणार आहे.
सावरगाव घाट हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे. गावकऱ्यांनी दसरा मेळाव्यासाठी निमंत्रण दिल्यानंतर आता गडाऐवजी भगवान बाबांच्या जन्मभूमीतच दसरा मेळावा घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
नामदेव शास्त्रींचा पंकजांना विरोध
पंकजा मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्रींना पत्र लिहून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर ठाम असून भगवान गडावर राजकीय भाषण करण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे.
प्रशासनानेही परवानगी नाकारली
पंकजा मुंडे समर्थकांनी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि अर्जदाराकडे विश्वस्तांचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाही.
संबंधिता बातम्या
भगवान बाबांच्या कर्मभूमीत जमलं नाही ते आता जन्मभूमीत जमणार?
गडावर नव्हे, संत भगवान बाबांच्या जन्मभूमीवर दसरा मेळावा होणार?
भगवानगड दसरा मेळाव्याला जिल्हा प्रशासनानेही परवानगी नाकारली!
पहिली आणि शेवटची विनंती करते, पंकजांचं नामदेव शास्त्रींना पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
राजकारण
नाशिक
Advertisement