एक्स्प्लोर
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट; नामदेव शास्त्री, धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
भगवान गडावरील दसरा मेळाव्यानिमित्त होणाऱ्या भाषणाला महंत नामदेव शास्त्री परवानगी नाकारल्यानंतर, सावरगाव या भगवान बाबांच्या जन्मगावी गेल्या वर्षी पहिल्यांदाच दसरा मेळावा घेण्यात आला.
बीड : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचं नाव न घेता फेसबुक पोस्टमधून समाचार घेतला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडेंनी ही फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
"कोणी आपल्यावर वार केला तर त्यांच्यावर प्रतिवार करण्यात माझी सर्व शक्ती मी का लावू? त्यापेक्षा नवा डाव मांडून लोकांना सुरक्षित आणि शांत ठेवणं मला योग्य वाटलं. आपले शब्द दूषित करुन कोणावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा निर्मितीवर मी जोर देते आणि त्या दिशेने मी वाटचाल ठरवली," असं पंकजा मुंडे यांनी लिहिलं आहे
भगवान गडावरील दसरा मेळाव्यानिमित्त होणाऱ्या भाषणाला महंत नामदेव शास्त्री परवानगी नाकारल्यानंतर, पंकजा मुंडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून दसरा मेळाव्यासाठी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. बीडमधील सावरगाव या भगवान बाबांच्या जन्मगावी गेल्या वर्षी पहिल्यांदाच दसरा मेळावा घेण्यात आला आणि या वर्षीही याच ठिकाणी दसरा मेळावा घेण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी महंत नामदेवशास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "भक्ती आणि शक्तीचा योग्य समन्वय लोकांना ऊर्जा प्रेरणा आणि आशा देतो. ऊस तोडणाऱ्याच्या कोयत्याला धार, गरीबाच्या स्वप्नाला आधार देतो, हेच मिळतं ना दसऱ्याला..आपल्याला, मला आणि तुम्हाला. माझ्या भगवान बाबांच्या दर्शनाने व मुंडे साहेबांच्या भाषणातून इतकी ऊर्जा घेऊन जात होते लोक ती ऊर्जा त्यांच्याकडून हिरावून घेणे अशक्यच. ही अशक्य बाब हिरावून घेण्याचा प्रयत्न झालाच. हे उद्ध्वस्त करण्याचा डाव ही आखला गेला पण कोणी आपल्यावर वार केला तर त्यांच्यावर प्रतिवार करण्यात माझी सर्व शक्ती मी का लावू? त्यापेक्षा मी नवा डाव मांडून माझ्या लोकांना सुरक्षित व शांत ठेवणे मला क्रमप्राप्त वाटले. आपले शब्द दूषित करुन कोणावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा निर्मितीवर मी जोर देते आणि त्या दिशेने मी वाटचाल ठरवली."
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement