एक्स्प्लोर
Advertisement
शिर्डीतील कार्यक्रमावरुन पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंच्या आरोपांना उत्तर
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी राज्य सरकारकडून सरकारी पैसा वापरला जात आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्याच्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं.
बीड : खर्च नेमका कशावर करायचा? करमणुकीच्या कार्यक्रमावर करायचा? की पिढ्यांना वाया घालवण्यासाठी करायचा? का उत्सवाच्या नावाखाली चुकीची प्रथा राबवण्यासाठी करायचा? असा सवाल करत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चावरुन धनंजय मुंडे यांनी टीका केली होती.
शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामविकास विभागाच्या कार्यक्रमावर सरकारने दोन कोटी रुपयांचा खर्च केला आहे आणि हा खर्च करून पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना आज पंकजा मुंडे यांनी चांगल्या कामासाठी हा खर्च होत असेल तर त्यात वावगं काय असं म्हणत चुकीच्या कामापेक्षा गरीबांसाठी खर्च करणं कधीही चांगलंच आहे, असं सांगितलं.
विरोधकांचं पोटशूळ हा राज्यातील अडीच लाख बेघरांना घर मिळतंय त्यामुळे उठत आहे. शासनाने राबविलेल्या योजनांचा प्रसार, प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी तो खर्च करण्याचे अधिकार आहेत, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
शिर्डीत 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान आवास योजनेचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात विविध जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना हक्काचं घर दिलं जाणार आहे. पंकजा मुंडेंच्या ग्रामविकास खात्यामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
धनंजय मुंडेंनी गणेशोत्सवादरम्यान परळीत डान्सर सपना चौधरीला निमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमावरुन धनंजय मुंडेंवर टीकाही झाली होती. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रमात अशा नृत्याची गरज काय असाही सवाल करण्यात आला होता. तोच मुद्दा धरत पंकजा मुंडेंनी कुणाचंही नाव न घेता टोला लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
व्यापार-उद्योग
ट्रेडिंग न्यूज
Advertisement