एक्स्प्लोर
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयातील फोन पुन्हा खणखणणार!
पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुकवरील अधिकृत पेजवर अपडेट करत आपले वडील गोपीनाथ मुंडे जो फोन वापरत होते. तोच फोन नंबर पंकजा यांनी परत चालू केला आहे.
बीड : पंकजा मुंडे यांनी यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे काम राज्यभर करण्याचे जाहीर केले आहे. म्हणूनच गोपीनाथ मुंडे मुंबईमध्ये ज्या कार्यालयात बसून काम करायचे त्याच कार्यालयात बसून पंकजा मुंडे पुन्हा काम करणार आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयाचा टेलीफोन नंबर होता तो पुन्हा एकदा पंकजा मुंडे वापरणार आहेत.
पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुकवरील अधिकृत पेजवर अपडेट करत आपले वडील गोपीनाथ मुंडे जो फोन वापरत होते. तोच फोन नंबर पंकजा यांनी परत चालू केला आहे. मंत्री असताना मागील पाच वर्षापासून पंकजा मुंडे रॉयल स्टोनवरून आपलं काम पाहायच्या आता तेच काम त्यांच्या या नवीन कार्यालयातून चालू असणार आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच वडिलांप्रमाणेच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तळागाळातील शेवटच्या समाजघटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी गोपीनाथ मुंडेयांचा वरळी मधील ऑफीसचा +91 22 2490 0993 हा जुना नंबर कालपासून पुन्हा पंकजा मुंडेंकडून सुरू करण्यात आला आहे.
येत्या 26 तारखेपासून पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यभर आपला दौरा करणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर दीड महिन्यांनी पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात परतल्या होत्या. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी मोठे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे यांनी आपल्या पुढील राजकारणाची दिशा ठरवली आहे. त्यामुळे आगामी काळात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून त्यांचे राज्य भर दौरा काढणार आहेत. या सोबतच भाजपाची भूमिका नेमकी कशी असणार आहे पाहणेसुद्धा मोठ औत्सुक्याचे असणार आहे.
भाजप पक्ष मी सोडणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी आपल्या आजच्या भाषणातून ठासून सांगितलं. तसंच 27 जानेवारीला औरंगाबादमध्ये उपोषण करणार असून त्यानंतर राज्यभर मशाल दौरा करणार असल्याचा निश्चय पंकजांनी केलाय. सोबतच कोअर कमिटीतून मला मुक्त करा, असं आवाहनच पंकजांनी केलंय. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे गोपीनाथगडावरील मेळाव्याच्या व्यासपीठावरुन भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
नाशिक
नाशिक
Advertisement