एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : पुरस्कार सोहळ्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची गळाभेट
गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले राजकारणातले सर्वात दिग्गज भाऊ-बहीण आज एकाच मंचावर आले. फक्त मंचावरच आले नाहीत तर त्यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली.
मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले राजकारणातले सर्वात दिग्गज भाऊ-बहीण आज एकाच मंचावर आले. फक्त मंचावरच आले नाहीत तर त्यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली.
मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपले मतभेद दूर ठेवत पुरस्कार सोहळ्यात गळाभेट घेतली.
आज (मंगळवार) मुंबईत लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्कार सोहळ्यात धनंजय मुंडे यांना सर्वोत्कृष्ट राजकीय नेत्याचा पुरस्कार देण्यात आला. तेव्हा पंकजा मुंडे यांनाही मंचावर बोलावण्यात आलं. त्यावेळी दोन्ही बहीण-भावांनी एकमेकांची गळाभेट घेतली.
खरं तर दोघेही दोन वेगळ्या पक्षांच्या वाटेवर गेल्याने दोघांमध्ये दरी निर्माण झाली आहे. प्रसंगी दोघांनी एकमेकांवर चिखलफेकही केली. पण आज मात्र दोघांनी गळाभेट घेऊन बहीण-भावांमधलं नातं आजही कायम असल्याचं महाराष्ट्राला दाखवून दिलं.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
बीड
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement