एक्स्प्लोर
Advertisement
पंढरपुरात धावत्या एसटीचा दरवाजा पडून पादचारी जखमी
पंढरपूरमध्ये धावत्या एसटी बसचा दरवाजा निखळून पडल्यामुळे एक पादचारी जखमी झाला.
पंढरपूर : पंढरपूरमध्ये धावत्या एसटी बसचा दरवाजा निखळून पडल्यामुळे एक पादचारी जखमी झाला. सुदैवाने दुखापत गंभीर नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा 70 वा वाढदिवस राज्यभर धुमधडाक्यात सुरु असताना ही घटना समोर आली आहे.
पंढरपूर-सरकोली ही बस अण्णाभाऊ साठे चौकातून जात असताना चालकाच्या बाजूचा दरवाजा अचानक तुटला. हा दरवाजा रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीच्या अंगावर पडला. हा पादचारी सुदैवाने थोडक्यात बचावला. मात्र या अनपेक्षित घटनेमुळे एसटी बसमधील प्रवासी आणि पादचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या डेपोपैकी एक म्हणून पंढरपूरची ओळख आहे. वर्षभरात 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न येथून महामंडळाला मिळते. याशिवाय राज्यभरातील विविध विभागाला देखील यात्रा काळात कोट्यवधींचा फायदा मिळवून देण्याचे काम पंढरपूर डेपो करतो. वर्षभरात राज्य परिवहन बस मधून जवळपास दीड ते दोन कोटी भाविक आणि प्रवासी यातून पंढरपूरचा प्रवास करत असतात.
या घटनेमुळे एसटी बसच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा भंगार अवस्थेत गेलेल्या अनेक बसेसमधून राज्यातील अनेक ठिकाणी प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे या बसेस वेळीच भंगारात न गेल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
लातूर
Advertisement