एक्स्प्लोर

Pandharpur : कमरेला पिस्तूल लावून फिरणे तरूणांना पडले महागात; पंढरपूर पोलिसांकडून दोघांना अटक 

दोन तरूण कमरेला पिस्तूल लावून पंढरपूर (Pandharpur ) शहरातून रस्त्यावरून फिरत असल्याचे समोर आले आहे. पंढरपूर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

पंढरपूर : अलिकडे तरूणाईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच पंढरपूरमध्ये (Pandharpur ) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हेगारीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेले दोन तरूण कमरेला पिस्तूल लावून रस्त्यावरून फिरत असल्याचे समोर आले आहे. पंढरपूर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. अजय खाडे आणि गणेश शिंदे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या दोन तरूणांची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवेढा रोडवर अजय खाडे हा तरुण पिस्तूलसह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल पोलिसांना आढळून आले. 

दुसऱ्या घटनेत पंढरपूर शहरातील संत पेठ भागात राहणाऱ्या गणेश शिंदे या तरूणाला पिस्तूलसह कॉलेज चौकातून पोलिसांनी ताब्यात घेतले. एकाच दिवशी घडलेल्या या घोन्ही घटनांमुळे पंढरपूर शहरात पुन्हा गुंडगिरी डोके वर काढतेय का? असा प्रश्न उभा राहिला आहे. 

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेले हे दोन्ही तरूण कोणत्या कारणासाठी पिस्तूल घेऊन फिरत होते, याचा तपास आता पोलीस करीत आहेत. याबरोबरच अशा प्रकारची अजून किती हत्यारे शहरात आली आहेत याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

हातात विनापरवाना पिस्तूल घेऊन व्हिडीओ बनवून ते व्हाट्अपवर स्टेटसला ठेवत हिरोगीरी करणं, फेसबुकवर फोटो व्हिडीओ व्हायरल करणं, अशी प्रकरणे अलिकडे पुढे  येत आहेत. त्यामुळे अशा घटनांवर आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. 

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget