एक्स्प्लोर

जोपर्यंत नाना पटोलेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही, नागपूरमध्ये भाजप आक्रमक 

भंडारा, नाशिक यानंतर आता नागपूरमध्ये नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.

नागपूर : काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने वादंग निर्माण झाले आहे. याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भंडारा, नाशिक यानंतर आता नागपूरमध्ये देखील नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेसनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर 7 गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि एफआयर (FIR) ची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून जाणार नसल्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलीय. यावेळी नाना पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली.

या अंतर्गत गुन्हे दाखल करा

नाना पटोले यांनी मोदी यांच्याविरोधात भडकावू वक्तव्य केले असल्याचे बावनकुळे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या जीवाला धोका निर्माण करणे, मोदी यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांना पाठबळ देणे, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणे, जमावबंदी असताना जमाव तयार करणे,  समाजामध्ये तेढ निर्माण करणे, कोरोना नियमांचे पालन न करणे, देशात दंगे होती असे कृत्य करणे, आणि मोदी यांना जीवे मारण्याकरता षडयंत्र तयार करणे  या मुद्यातंगर्त  नाना पटोले यांच्यावर 7 गुन्हे दाखल करावे अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

यावेळी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या संख्येन भाजपचे कार्यकर्ते आले आहेत. तसेच नाना पटोले यांच्या विरोधात ते घोषणाबाजी देखील देत आहेत. जोपर्यंत नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही आणि एफआयरची प्रत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून जाणार नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे पटोले यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? पोलीस त्यांना अटक करणार का हे आता पाहावे लागेल.

नेमकं काय म्हणाले होते नाना पटोले

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले होते. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget