(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur : कार्तिकी एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, फडणवीसांचा असाही विक्रम
Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून त्यामुळे आषाढी आणि कार्तिकी महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिलेच राजकारणी ठरणार आहेत.
पंढरपूर: यंदा कार्तिकी एकादशीची (Kartiki Yatra) महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते होणार असून मंदिर समितीकडून देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तशा प्रकारची माहिती समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. यामुळे विठ्ठलाची आषाढी (Ashadhi Ekadashi) आणि कार्तिकी (Kartiki Ekadashi) या दोन्ही वेळी महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे. आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महापूजेचा मान मिळविणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले राजकारणी ठरणार आहेत.
परंपरेनुसार आषाढीची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. यावर्षी नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीची महापूजा केली होती. आता या सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) पूजेचा मान मिळणार आहे .
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे राज्यातील पाहिले राजकारणी असतील ज्यांना आषाढी (Ashadhi Ekadashi) आणि कार्तिकी (Kartiki Ekadashi) या दोन्ही शासकीय महापूजा करण्याचा योग आला आहे . यापूर्वी 2014 ते 2019 या काळात एक वर्षाचा अपवाद वगळता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना चार वेळा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली होती. यात 2018 मध्ये मराठा आंदोलन सुरु असताना आंदोलकांनी विरोध केल्यामुळे फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर आषाढीची महापूजा केली होती. पण आता पुन्हा फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यामुळे ते पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करणार आहेत. यामुळे आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही शासकीय महापूजा करण्याचा मान मिळणारे पहिलेच राजकारणी ठरणार आहेत.
आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. आषाढी वारीला ज्या प्रमाणे भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला येतात त्याचप्रमाणे कार्तिकी यात्रेलाही भाविकांची मोठी गर्दी असते. या दोन्ही एकादशीच्या दरम्यानच्या काळात चातुर्मास पाळला जातो.
आषाढीला गर्दीचा विक्रम
दोन वर्षानंतर झालेली आषाढी यात्रा विक्रमी झाली असून पंढरपुरात तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे. रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली.
महत्त्वाची बातम्या: