(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्र्यांच्या हिट विकेट पडू लागल्या आहेत; हर्षवर्धन पाटील यांची ठाकरे सरकारवर टोलेबाजी
सध्या महाविकास आघाडी सरकारमधील कोणालाच कोणाची गॅरंटी राहिलेली नसल्याने एवढा अविश्वास तयार झालाय की, कोणीच कोणावर विश्वास ठेवायला तयार नसल्याचेही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांनी सांगितले. या आरोपांबाबत भाजपने सीबीआय चौकशीची मागणी केली नाही, तर ती न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लावल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.
पंढरपूर : सध्या राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या पडत असलेल्या सर्व हिट विकेट असून त्यासाठी कोणी गुगलीही टाकायची वेळ आलेली नाही, आता ओपनिंग बॅट्समनच्या विकेट पडल्यात तशा हळूहळू बाकीच्याही जाणारच आहेत, अशी सणसणीत टोलेबाजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांनी केली. पोटनिवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचार सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत परिचारक आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. एखादा ऑन ड्युटी असलेला पोलीस कमिश्नर जेव्हा पत्र लिहून एवढे गंभीर आरोप करतो, तेव्हा या सरकारने या गोष्टीचं गांभीर्य ओळखायला हवे होते. आता मात्र या सरकारची विश्वासहार्यता गेल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
"कोणाला कसा मार बसतोय, कोण कोणाचे नाक दाबतंय, कोण कसे फरफटत चाललंय, कोण कोणाचे तोंड दाबतंय आणि कोण कोणाचा गाला दाबततंय, ते रोज आपण बघतोय", असा टोलाही हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील कोणालाच कोणाची गॅरंटी राहिलेली नसल्याने एवढा अविश्वास तयार झालाय की, कोणीच कोणावर विश्वास ठेवायला तयार नसल्याचेही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या आरोपांबाबत भाजपने सीबीआय चौकशीची मागणी केली नाही, तर ती न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लावल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला. सध्या हर्षवर्धन पाटील यांचे विरोधक आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळत असल्याने हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपच्या समाधान अवताडे यांच्या प्रचारात उतरले आहेत. आता प्रचाराची रंगात आणखी वाढू लागली आहे.
कल्याण काळे अजित पवारांच्या उपस्थितीत हातावर घड्याळ बांधणार
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करुन माढा लोकसभा जिंकून देणारे कल्याणराव काळे यांनी अवघ्या दीड वर्षात भाजपाला सोडचिट्ठी देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (8 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि करमाळा आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी पंढरपूर इथल्या श्रीयश मंगल कार्यालय इथे सकाळी हा कार्यक्रम होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :