एक्स्प्लोर

बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा वायुगळती! चार कामगारांचा मृत्यू, दोन जणांची प्रकृती गंभीर

पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीतील (Palghar Tarapur MIDC)  कारखान्यात पुन्हा एकदा वायुगळती झाली आहे. यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला आहे.

Palghar Tarapur MIDC : पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीतील (Palghar Tarapur MIDC)  कारखान्यात पुन्हा एकदा वायुगळती झाली आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ 13 मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड या कंपनीत वायुगळती झाली आहे. या वायुगळतीमुळं आठ कामगारांना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान जखमी कामगारांवर बोईसरमधील शिंदे या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांना जीव गमवावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

मृतांची नावे

1. कल्पेश राऊत 
2. बंगाली ठाकूर 
3. धीरज प्रजापती 
4. कमलेश यादव 

जखमींची नावे

1.रोहन शिंदे 
2. निलेश हाडळ

दरम्यान, आज दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान बोईसर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर 13 ता. जिल्हा पालघर येथील मेडली फार्मा या कंपनीत मध्ये नायट्रोजन रिएक्शन टॅंक मध्ये गॅस गळती झाल्याने अपघात घडला. त्यात सहा व्यक्ती बाधित झाले. त्यांना शिंदे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्यातील चार व्यक्ती मृत झाले आहेत. तर दोघांची परिस्थिती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये भरती करण्यात आलेले आहे त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

या कारखान्यात 36 कामगार काम करतात

या कारखान्यात 36 कामगार काम करत असताना ची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीस देशमुख यांनी दिली असून यापैकी पाच कामगार हे उत्पादन सुरू असताना त्या ठिकाणी काम करत होते त्यापैकी चार जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला असून तर दोन कामगार अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. नेमकी ही वायू गळती कशामुळे झाली याचा तपास पुढे सुरू करण्यात आला असून याविषयी योग्य ती कारवाई केली जाईल असं पालघरचे पोलीस अधीक्षक यतीस देशमुख यांनी सांगितलं आहे. तर सातत्याने या औद्योगिक कार्यक्षेत्रातील कारखान्यांमध्ये असे प्रकार घडत असून कुठेतरी कारखाना व्यवस्थापन कडून दुर्लक्ष होत होत असून सुरक्षा विभाग ही झोपेत असल्याचा आरोप आमदार राजेंद्र गावित यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

पालघरमधील तारापूर एमआयडीसीत वायुगळती; तीन कामगारांचा मृत्यू

 

 

 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
Embed widget