एक्स्प्लोर

पालघर भूकंपग्रस्त भागांत एनडीआरएफचे तंबू तैनात

या भूकंपाचे विश्लेषण करण्यासाठी नॅशनल जिओग्राफीकल रिसर्च इन्स्टिट्यूट, हैद्राबाद आणि दिल्ली येथून तज्ज्ञ दाखल झाले असून तीन ठिकाणी यासंबंधीची यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे.

डहाणू (पालघर)  :  जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांमध्ये जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्यांमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून रहिवाशांनी घराबाहेर झोपण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. यादृष्टीने त्यांच्या सोयीसाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून एनडीआरएफचे तंबू मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असून शनिवारी या तंबूंचे संबंधित ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले आहे. त्या प्रमाणे 42 ठिकाणी 200 तंबू उभारण्यात ही आले आहेत डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या भागात रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे स्वत: यावर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन डॉ.नारनवरे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आल्यानंतर शनिवारी सकाळी पुणे येथून ही टीम दाखल झाली. त्यांच्यामार्फत भूकंपग्रस्त गावांमध्ये 200 तंबू उभारण्यात आले आहेत. सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी धुंदलवाडी येथे आढावा बैठक घेऊन आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतींना या तंबूंचे वाटप केले. डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग, तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे, सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या परिसरात राबविण्यात येत असलेल्या यंत्रणेबद्दल माहिती देताना कटियार म्हणाले, डहाणूमधील 15 आणि तलासरीमधील सात गावे भूकंपाच्या धक्क्यांमुळे प्रभावित झाली आहेत. या भूकंपाचे विश्लेषण करण्यासाठी नॅशनल जिओग्राफीकल रिसर्च  इन्स्टिट्यूट, हैद्राबाद आणि दिल्ली येथून तज्ज्ञ दाखल झाले असून तीन ठिकाणी यासंबंधीची यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे. महसूल, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी येथील परिस्थितीबाबत दक्ष आहेत. रहिवाशांच्या सोयीसाठी एनडीआरएफ च्या 200 तंबूंसह 70 ते 80 लोकांची सोय होईल असे आणखी मोठे तंबू लावले जात आहेत. विद्यार्थ्यांचीही सोय लक्षात घेऊन हे तंबू विशेषत: शाळा आणि आश्रमशाळांच्या आवारात लावले जात आहेत. याशिवाय 3 रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत येथे झालेल्या नुकसानीबाबत पंचनामा केला जाणार आहे. भूकंपामुळे रात्री घराबाहेर झोपण्याचे आवाहन प्रशासनाने केल्याच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांमध्ये सुरक्षेची भावना राखण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी पोलीस दल कार्यरत असून तलासरी पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकारी, पाच कर्मचारी आणि 11 जणांचे प्लाटून संपूर्ण परिसरात गस्त घालत असल्याची माहिती परिविक्षाधीन अधिकारी (भापोसे) श्रवण दत्त एस. तसेच पोलीस उपअधीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली. पालघरमधील भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम - 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल - 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल - 1 डिसेंबर - 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केल - 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल - 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल - 10 डिसेंबर - 2.8 व 2.7 रिश्टर स्केल - 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल - 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल - 1 फेब्रुवारी - 3.3, 3.5, 3.0, 4.1 रिश्टर स्केल संबंधित बातम्या पालघर भूकंप : एनडीआरएफची दोन पथकं पोहोचली, नागरिकांमध्ये जनजागृती करणार पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, चिमुकलीचा मृत्यू

VIDEO | पालघर जिल्ह्यात भूकंपाचे दिवसभरात पाच धक्के! | एबीपी माझा

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत

भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर जिल्हा जेरीस, नागरिक धास्तावले

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Embed widget