एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघरच्या प्रचारासाठी स्मृती इराणी मैदानात, आज रोड शो
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.
पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुखांच्या सभा आणि रोड शोने पालघर मतदारसंघ ढवळून निघाला आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.
भाजपने उत्तर भारतीय मतं खेचण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अभिनेता आणि खासदार मनोज तिवारी यांच्यासह अनेक उत्तर भारतीय नेत्यांना पालघरच्या मैदानात उतरवलं आहे.
त्यामध्ये आता केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचाही समावेश झाला आहे.
स्मृती इराणी आज डहाणू भागात भाजपचा प्रचार करणार आहेत, तर दुपारी स्मृती इराणी रोड शो करतील.
शिवसेना पक्षप्रमुखांचा पालघर दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पालघरमध्ये सभा आणि प्रचाराचा धडाका लावला आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची वसईत प्रचारसभा झाली.
त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची पालघर शहरात दुसरी जाहीर सभा होतेय. काल उद्धव ठाकरेंना पालघर मतदारसंघाचा ग्रामीण भाग पिंजून काढला. त्यानंतर आता समुद्र किनारी भागातील मतदारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत.
योगी आदित्यनाथ
योगी आदित्यानाथ यांनीही 23 मे रोजी विरारमध्ये प्रचारसभा घेतली होती. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला वेगळं करणारे महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात मात्र कृती अफझल खानासारखी करतात', असं म्हणत योगींनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला होता.
बविआच्या प्रचारासाठी सुपरस्टार दिनेश यादव
तिकडे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या प्रचारासाठी सुपरस्टार दिनेश यादव पालघरमध्ये येणार आहे. दिनेश यादवही बवीआच्या प्रचारार्थ रोड शो काढणार आहे. विरार, नालासोपारा आणि वसई या परीसरातून हा रोड शो निघणार आहे.
पालघरची पोटनिवडणूक सध्या राजकीय आखाडा बनली आ. सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक जिंकायची आहे. 2019 च्या निवडणुकीआधीची ही रंगीत तालीम मानली जात आहे.
पालघर पोटनिवडणूक
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.
शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होईल.
संबंधित बातम्या
नाव छत्रपतींचं, कृत्य अफझलखानाचं, विरारमध्ये योगींचा सेनेला टोला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement