एक्स्प्लोर

'भारतात हेरगिरीसाठी पाकिस्तान शोधतंय एजंट' नाशिक कनेक्शनमध्ये सुरक्षा यंत्रणांच्या तपासात माहिती उघड

हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान भारतात एजंट शोधत असल्याची धक्कादायक माहिती सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघडकीस आली आहे. मागील आठवड्यात नाशिकमध्ये देवळाली कॅम्प आणि एचएएलमध्ये हेरगिरी केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

नाशिक : हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान भारतात एजंट शोधत असल्याची धक्कादायक माहिती सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघडकीस आली आहे. मागील आठवड्यात नाशिकमध्ये देवळाली कॅम्प आणि हिंदुस्थान एरोनॅटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलमध्ये हेरगिरी केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.  या दोन्ही घटनांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हनी ट्रॅप आणि इतर मार्गांचा अवलंब काही असंतुष्ट आणि सरळ साध्या लोकांनाही पाकिस्तान आपल्या जाळयात ओढत असल्याचं तपासात समोर येत आहे. भारतातील सावज टिपताना हनी ट्रॅप आणि इतर मार्गांचा अवलंब केला जात आहे. एच ए एल मधील कर्मचारी दीपक शिरसाट हा दोन वर्षांपूर्वी हनी ट्रॅपचा शिकार झाला होता. तेव्हापासून तो लढाऊ विमान बांधणी, आणि इतर संवेदनशील प्रकल्पाची माहिती आयएसआयच्या एजंटकडे पोहोचवीत होता. या काळात त्याने बरीच महत्वपूर्ण माहिती पाकिस्तानपर्यंत पोचविली आहे. तर दुसरीकडे देवळाली कॅम्प येथील तोफखाना केंद्रात एका बांधकामच्या साईटवर कंत्राटी काम करणारा संजीव कुमार सहा महिन्यापूर्वी पाकिस्तान एजन्सीच्या जाळयात अडकला होता. सुरुवातीला त्याच्याशी भांडण करण्याचा बनाव रचला आणि नंतर मैत्री वाढवून माहिती घायला सुरवात केली. त्यानेही तोफखाना केंद्राचे फोटो पाकिस्तान मध्ये पाठवले, पण लष्करी जवानांच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानी मनसुबे उधळले गेलेत.

नाशिक पोलिस आयुक्तांकडून सावधगिरीच्या सूचना या दोन्ही घटनांच्या तपासावरून भारतात हेरगिरी करण्यासाठी एजंट शोधत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, इतर देशातील नागरिकांशी संवाद साधताना सावधानता बाळगावी. इतर देशातील अनोळखी नागरिकांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे. त्याच बरोबर शहरातील देशाच्या सुरक्षेशी संदर्भात असणाऱ्या आस्थापनांच्या परिसरात स्मार्टफोन वापरण्यास बंदी घालावी, असे पत्र नाशिक पोलिसांनी आस्थापनांना दिल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे यांनी दिली आहे.

पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा नाशिकमध्ये हनीट्रॅप, हेरगिरीच्या आरोपाखाली एचएएल कर्मचार्‍याला अटक

कसा अडकला दीपक शिरसाट

दहशतवादी विरोधी पथक नाशिक युनिटला अतिशय गोपनीय माहिती मिळाली की, भारतीय एरोनॉटिकलमध्ये काम करणारा एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला अतिशय गोपनीय माहिती पुरवत आहे. माहितीचा गांभीर्य लक्षात घेता दहशतवादी विरोधी पथक सक्रिय झालं आणि हा व्यक्ती नेमका कोण आहे याच्या शोधात लागले. हा माहिती पुरवणारा व्यक्ती इंडियन एरोनॉटिकल लिमिटेडचा कर्मचारी दीपक शिरसाट होता. दीपक याला हॅनीट्रप मध्ये पाकिस्तानी इंटलीजन्स एजन्सी आयएसआयने अडकवले. आरोपी शिरसाटने भारतीय लढाऊ विमानांविषयी गुप्त माहिती तसेच इतर संवेदनशील माहिती आयएसआयला दिल्याचा आरोप आहे. MiG-21FL, MiG-21M, MiG-21 BIS, MiG-27, Su-30 MKI फायटर जेट, K-13 मिसाइल सारख्या महत्त्वपूर्ण जेट आणि मिसाइलबद्दल पाकिस्तानी एजन्सी आयएसआयला माहिती दिली. दिपकला या जाळात अडकवण्यासाठी एक सुंदर मुलीचा वापर केला गेला. हसीना नावाच्या मुलीने जानेवारी 2019 मध्ये सोशल मीडीयावर दीपकशी मैत्री केली. काही महिन्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या हसीनानं दिपकला इमोशनली कनेक्ट केलं. या मुलीने दिपकचा विश्वास जिंकला आणि हळूहळू त्याच्या बद्दल सगळी माहिती घेतली. या मुलीने दिपकच्या मदतीने एचएएलच्या आत काय चालत याची माहिती घेतली पण तिला आतले फोटो, व्हिडियो आणि इतर माहिती हवी होती. त्यामुळे तीने दिपक सोबत ॲानलाइन अश्लील गोष्टी करायला सुरुवात केली. त्या मुलीने दिपकचे फोटो व्हिडीयो काढले आणि नंतर त्याला ब्लॅकमेल केलं. दीपकने भीतीपोटी 6 महिन्यापर्यंत हसीनाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. नंतरही माहिती पुरवणार होता पण त्याआधी एटीएसला माहिती मिळाली आणि त्याला अटक केली गेली. दिपकने पोलिसांना सांगितले की, त्याने एचएएलबद्दलही सगळी माहिती त्याने तिला पोहोचवली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget