एक्स्प्लोर

महाराष्ट्रात आम्ही सुरक्षीत, विद्यार्थ्यांनी घेतली जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरींची भेट, म्हणाले, आमच्या भावावर हल्ला झालाय

महाराष्ट्रात राहणाऱ्या काश्मीरी विद्यार्थी आणि नोकरदारांनी आज जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Pahalgam terrorist attack : महाराष्ट्रात राहणाऱ्या काश्मीरी विद्यार्थी आणि नोकरदारांनी आज जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आपण काश्मीरपासून घरापासून जरी दूर महाराष्ट्रात राहत असलो तरी महाराष्ट्र आपलं दुसरं घर आहे. महाराष्ट्रात सुरक्षित असल्याची भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्रातील त्यासोबतच देशातील लोकांनी सध्या परिस्थितीत कश्मीरी लोकांना जी काश्मीरच्या बाहेर राहत आहेत त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि भावाप्रमाणे वागवलं पाहिजे, अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील लोक हे आमचे भाऊ आहेत

आजच्या स्थितीत सुद्धा आमची घर ही महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी खुली आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्रातील लोक हे आमचे भाऊ आहेत. द्वेषाची  भावना पसरवण्यापेक्षा देशातील कश्मीरींना प्रेमाने वागवा, अशी विनंती सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली. महाराष्ट्रात आम्ही सुरक्षित त्यामुळं कश्मीरी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारचे प्रशासनाचे आभार मानले. आम्हाला समजून घ्या आम्ही तुमचे भाऊ आणि महाराष्ट्रातील लोक आमचे भाऊ, काश्मीर बाहेर राहणाऱ्या कश्मीरी विद्यार्थ्यांची देशवासियांना विनंती केली आहे.

महाराष्ट्रातील पर्यटकांना आजही हॉटेल्स बंद असतील तर आमची घर उघडी

महाराष्ट्रातील पर्यटकांना आजही हॉटेल्स बंद असतील तर आमची घर उघडी आहेत तुम्ही आमच्या घरी या. द्वेषाची भावना न बाळगता प्रेमाने वागवा असे कश्मीरी विद्यार्थी म्हणाले. दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या राज्यावर हा धब्बा लागला आमच्या पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे. आमचे घरचे सुद्धा घाबरले आहेत. आम्ही दूर राहतो म्हणून ते आम्हाला कॉल करतात व्हिडिओ कॉल करतात. आम्ही त्यांच्या डोळ्यापासून दूर आहोत त्याच्यामुळे ते थोडे घाबरतात पण महाराष्ट्रात कुठे काय आम्हाला प्रॉब्लेम आलेला नाही असे काश्मीरी विद्यार्थी म्हणाले. 

काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात एक होस्टेल बनवा

जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं काही अडचण आली तर आम्ही तुमच्या संपर्कात राहू असे विद्यार्थी म्हणाले. कश्मीरी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात एक होस्टेल बनवा अशी मागणी आम्ही केली आहे. शिवाय टाटामध्ये जे कॅन्सरसाठी पेशंट आले आहेत त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी एक हॉस्टेलची सोय करावी. नफरत की माहोल को प्यार में बदलना चाहिए अशी आम्ही मागणी केल्याचे विद्यार्थी म्हणाले. 

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही जणांचा मृत्यू झाला आहे, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, आम्हालाही दुःख झाल्याचे विद्यार्थी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे सरकार असेल त्यांचे सगळ्यांचे आम्ही आभार मानत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांनी आम्हाला खूप प्रेम दिल्याचे विद्यार्थी म्हणाले. 

आम्ही कुठलाही धर्म बघितला नाही, पर्यटकांना पूर्णपणे सहकार्य केलं

 पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अजूनही काश्मीरमध्ये यायचं असेल तर त्यांनी तो प्लान करावा काश्मीरमधील लोकांना सुद्धा महाराष्ट्रातील लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. जर टूरिस्ट स्पॉट बंद असतील किंवा हॉटेल्स नसतील तर आमच्या घरी तुम्ही राहा आम्ही तुमचे स्वागत करु आमचे घर तुमच्यासाठी खुले असतील असे विद्यार्थी म्हणाले. महाराष्ट्रातील लोक हे आमचे भाऊ आहेत. आम्ही कुठलाही धर्म बघितला नाही आणि पर्यटकांना पूर्णपणे सहकार्य केल्याचे विद्यार्थी म्हणाले. आम्ही माणुसकीचा धर्म पाळला आहे असे म्हणाले.

पर्यटकांवर झालेला हल्ला हा पर्यटकांवरचाच नाही तर आमच्या भावावर झालेला हल्ला

आमचा धर्म जरी वेगळा असेल तरी आपण सगळे हिंदुस्तानी आहोत सगळ्यांच एकच रक्त आहे. पर्यटकांवर झालेला हल्ला हा पर्यटकांवरचाच नाही तर आमच्या भावावर झालेला हल्ला आहे असे विद्यार्थी म्हणाले. आमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही सुद्धा तुमचे भाऊ आहोत तुम्ही सुद्धा आमचे भाऊ आहात असे विद्यार्थी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

भारत-पाक सीमेवर हालचालींना वेग, सरकार घेणार मोठा निर्णय? शेतकऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget