एक्स्प्लोर

Indian Institute of Technology (IIT) Bombay : काॅलेजच्या अभ्यासक्रमात सेक्स एज्युकेशनचा समावेश केला पाहिजे; 76 टक्के आयआयटी मुंबईमधील विद्यार्थ्यांचे मत!

जवळपास 36 टक्के पदवीधर आणि 59 टक्के पदव्युत्तर विद्यार्थी विविध प्रकारच्या लैंगिक संबंधात गुंतले आहेत. त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक लोकांना कोणतेही औपचारिक लैंगिक शिक्षण मिळालेले नाही.

Indian Institute of Technology (IIT) Bombay :  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेमधील (Indian Institute of Technology (IIT) Bombay) 76 टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन अभ्यासक्रमात औपचारिक लैंगिक शिक्षणाची गरज (sex education) असल्याचे म्हटले आहे. जवळपास 1 हजारहून अधिक आयआयटी विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या नमुना सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी लैंगिक शिक्षणावर भर दिला आहे. 

36 टक्के पदवीधर आणि 59 टक्के पदव्युत्तर विद्यार्थी विविध लैंगिक संबंधात

इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 36 टक्के पदवीधर आणि 59 टक्के पदव्युत्तर विद्यार्थी विविध प्रकारच्या लैंगिक संबंधात गुंतले आहेत. त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक लोकांना कोणतेही औपचारिक लैंगिक शिक्षण मिळालेले नाही. तर 38 टक्क्यांहून अधिक लोकांना लैंगिक संक्रमण किंवा रोग (STI/STD) बद्दल माहिती नसल्याचे समोर आलं आहे. आयआयटी मुंबईच्या अधिकृत विद्यार्थी मीडिया संस्था असलेल्या इनसाइटने केलेल्या सर्वेक्षणातील हे निष्कर्ष आहेत. अनेक राज्यांमधील शैक्षणिक संस्थांनी सामान्यतः निषिद्ध मानल्या जाणाऱ्या या विषयापासून दूर राहणे पसंत केले आहे. तथापि, इनसाइच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि लेखकांच्या टीमने कॅम्पसमधील मुलाखतींचे संकलन आहे. यामध्ये लैंगिक संमतीपासून ते गर्भनिरोधकांपर्यंत, लैंगिक संक्रमित रोग, हस्तमैथुन, पोर्नोग्राफी आणि लैंगिक अत्याचारापर्यंत बाबींचा समावेश होता. 

तोंडावाटे संभोग करताना गर्भनिरोधकांच्या वापराबाबत माहिती नाही 

टीमने माहिती एकत्र करण्यात जवळपास 11 महिन्यांचा कालावधी घेतला. जानेवारी 2024 मध्ये एक सर्वेक्षण केले गेले ज्यामध्ये 1,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कॅम्पसमधील 'सेक्स' बद्दलच्या एकूण कल्पनांमध्ये डोकावून पाहिले. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, केवळ 28 टक्के सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्यांनी संबंधित शाळांमध्ये त्यांचे पहिले औपचारिक लैंगिक शिक्षण घेतले आहे. पण फक्त 12 टक्के लोकांनाच STD किंवा STI बद्दल माहिती आहे. 38 टक्के लोकांना त्यांच्याबद्दल पूर्णपणे जागरुकता नाही, तर लक्षणीय 49 टक्के लोकांना त्याबद्दल काही प्रमाणात माहिती आहे, परंतु संपूर्णपणे नाही. एकीकडे, गर्भनिरोधकांच्या वापराबाबत एकंदरीत जागरुकता असताना, 25 टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांना तोंडावाटे संभोग करताना गर्भनिरोधकांच्या वापराबाबत माहिती नसते.

1,028 उत्तरदात्यांपैकी 85 टक्क्यांहून अधिक जणांनी सांगितले की ते हस्तमैथुन करतात. सर्वाधिक 38.7 टक्के पुरुषांनी असे व्यक्त केले की ते आठवड्यातून काही वेळा हस्तमैथुन करतात. महिलांमध्ये, सर्वाधिक (35 टक्क्यांहून अधिक) त्यांनी सांगितले की त्या करत नाहीत, तर  33.3 टक्क्यांनी असे व्यक्त केले की निवडक प्रसंगी हस्तमैथुन करतात. अश्लील सामग्री काही लोकांना हस्तमैथुनासाठी उत्तेजन देऊ शकते, असेही लेखात म्हटले आहे. 

पोर्न-व्यसनावर चिंता

पॉर्नबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे या प्रश्नासाठी मिळालेल्या 1,028 प्रतिसादांमधून, 661 विद्यार्थ्यांनी पोर्न-व्यसनावर चिंता व्यक्त केली. पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढल्याचेही लक्षात आले. सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा निष्कर्ष असे दर्शवितो की पुरुषांच्या तुलनेत महिला, विद्यार्थिनी लैंगिक-संबंधित वैद्यकीय सहाय्यासाठी IIT बॉम्बे रुग्णालयात जाण्याची शक्यता कमी असल्याचेही म्हटले आहे. सर्वेक्षणात समोर आलेल्या कारणांनुसार, 33.8 टक्के लोकांना वाटते की जर त्यांनी संस्थेच्या रुग्णालयात संपर्क साधला तर त्यांचा लैंगिक वैद्यकीय इतिहास प्रशासनाला कळवला जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असताRajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराजNarendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Embed widget