(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : असली बुद्धी येतेच कुठून! फुटपाथवर राहणारी भिक्षुकी महिला रात्री लघुशंकेसाठी गेली अन् तिथेच नराधमाने लैंगिक अत्याचार केला; नातेवाईकांवर गुन्हा दाखल
रस्त्यावर भिक्षा मागून उदरर्निवाह करणाऱ्या महिलेवर नातेवाईकांनीच फुटपाथवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत आहे. त्यात हल्ले, किरकोळ कारणावरुन भांडणं, खंडणी आणि फसवणुकीच्या घटनांचा समावेश आहेत. त्यातच बलात्काराच्या (Rape) घटना जास्त प्रमाणात समोर येत आहे. अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना पुण्यातून (Pune) समोर येत आहे. रस्त्यावर भिक्षा मागून उदरर्निवाह करणाऱ्या महिलेवर नातेवाईकांनीच फूटपाथवर (Footpath) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेवर नातेवाईकांनीच फूटपाथवर बलात्कार केला. आरटीओ ऑफिस शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात 25 आणि 26 एप्रिलच्या रात्री हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फिर्यादीचे नातेवाईक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भीक मागून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. फुलेनगर येथील आरटीओ ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात त्या कुटुंबासह राहतात. 25 एप्रिलच्या रात्री त्या जेवण करुन फूटपाथवर झोपल्या होत्या. दरम्यान रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या लघुशंकेसाठी गेल्या असताना एका आरोपीने त्यांना पकडून जबरदस्तीने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास येरवडा पोलीस (Yerwada Police) करत आहे.
नराधमांना शिक्षा कधी मिळणार?
पुण्यात लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. रोज अनेक नवे प्रकरणं समोर य़ेत आहे. ही प्रकरणं रोखण्यासाठी शाळा आणि बाकी स्तरांवरुन अनेक योजना राबवल्या जात आहे. मात्र तरीही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणं थांबत नसल्याचं समोर येत आहे. ही प्रकरणं रोखण्यासाठी शाळेत गुड टच बॅड टच वर्गही घेण्यात येत आहे. त्या वर्गातही अनेक मुली त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारासंदर्भात बोलू लागल्या आहे. या वर्गाच्या माध्यमातून अनेक प्रकरणं समोर येत आहे. त्यामुळे अनेक नराधमांना शिक्षादेखील होत आहे. यासोबतच मुलींबरोबर महिलादेखील शहरात असुरक्षित असल्याचं मागील दिवसांमध्ये घटलेल्या काही घटनांवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्यात सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.