एक्स्प्लोर

प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघालेला 'उस्मानाबादचा पठ्ठ्या' अखेर घरी परतला

फेसबुकवर ओळख झालेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी निघालेला उस्मानाबादचा झिशान सिद्दीकी अखेर घरी परतला आहे. 11 जुलैला सकाळी 10 वाजता घर सोडून तो सायकलवर अहमदनगर व तिथून मोटार सायकलने गुजरात स्थित कच्छच्या भारत पाक सीमेपर्यंत पोहचला होता.

उस्मानाबाद : उस्मानाबाद पोलिसांच्या सतर्कतेने फेसबुकवर ओळख झालेल्या प्रेयसीला भेटणासाठी निघालेला उस्मानाबादचा झिशान सिद्दीकी अखेर घरी परतला आहे. रात्री उशिरा उस्मानाबाद पोलिसांचं एक पथक झिशानला घेऊन दाखल झाले. ख्वाजानगर उस्मानाबाद येथील मौलाना सलीम सिद्दीकी यांचा मुलगा झिशान हा मेकॅनिकल अभियांत्रिकी शिक्षण घेतो. फेसबुकवर पाकिस्तानची मुलगी सामराच्या संपर्कात आला होता. तिच्या प्रेमात पडल्यानंतर तिला भेटण्यासाठी 11 जुलैला सकाळी घर सोडून सायकलवर अहमदनगर व तेथून मोटार सायकलने गुजरात स्थित कच्छच्या भारत पाक सिमेपर्यंत पोहचला होता. त्याची वडिलांनी तो मिसींग असलेल्याची तक्रार नोंदवली होती. गुजरात पोलीसांनी सापळा रचून झिशानला मुलाला बीएसएफच्या मदतीने पकडले होते. झिशानची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी गुजरात न्यायालयात हजर केले. तेव्हा जमियात ए उलमा ए हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मौलाना नदीम सिद्दिकी यांनी जामिनासाठी वकिलाची व्यवस्था केली आणि झिशानला जामिनावर सोडण्यात आले. उस्मानाबाद पोलिस अधीक्षकांना फोनवर ही माहिती मिळाल्यावर एलसीबीचे पोलीस उपनिरिक्षक खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली गुजरातला पथक पाठवून झिशानला ताब्यात घेऊन पथक कालच उस्मानाबादसाठी निघाले. ते रात्री दीड वाजता उस्मानाबादला पोहोचले. झिशान सिद्दिकीला गुजरात पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरोधात कलम 3 आणि भादंवि 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. गुजरात पोलिसांनी झिशान खरंच मुलीच्या प्रेमात पडला होता का? की त्याचा आणखी काही हेतू होता? या अंगाने तपास केला. 'असं' घरी सांगून 'तो' प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात! सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन 20 वर्षीच्या झिशानला 17 जुलै रोजी पकडले. यासंदर्भात झिशानच्या वडिलांशी एबीपी माझाने संवाद साधला होता. ते म्हणाले की, झिशान 11 तारखेला दहा वाजता घरातून बाहेर पडला. मोबाईलचा चार्जर आणायचा आहे, म्हणून तो घराबाहेर पडला. एक तास होऊनही तो घरी आला नाही त्यावेळी त्याला फोन केला. तर त्याचा फोन बंद आला, असं त्यांनी सांगितलं होते. ते म्हणाले की, आम्ही वाट पाहिली पण तो घरी आला नाही. तीन महीने झालं लॉकडाऊनमध्ये तो कधीच बाहेर पडला नाही. आम्ही त्याला बाहेर जा म्हटलं तर तो म्हणायचा, बाहेर लॉकडाऊन आहे, बाहेर काय पोलिसांचा मार खायला जाऊ काय. तो नमाज वगेरे घरातूनच करायचा. मात्र त्या दिवशी तो घराच्या बाहेर पडला. दिवसभर तो घरी न आल्यानं आम्ही सात वाजता पोलिस स्थानकात मिसिंगची तक्रार केली आणि लोकांना मेसेजही केले. आम्ही दुसऱ्या दिवशी रविवारी आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेतला.सोमवारी आम्हाला माहिती मिळाली की, वाशीमधून कॉल आला की तो, शनिवारी रात्री वाशीत होता. तो इथून रिकाम्या हातीच गेला, असंही ते म्हणाले होते. VIDEO | UNCUT | प्रेयसीला भेटण्यास पाकिस्तानला निघालेल्या तरुणाच्या वडिलांची प्रतिक्रिया भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात आम्हाला बातमी पाहून कळलं की तो बॉर्डरवर सापडला. तो तेरणा कॉलेजला तिसऱ्या वर्षाला इंजिनियरिंगचं शिक्षण घेत आहे. मुलगा असा जाईल असं आम्हाला कधीच वाटत नव्हतं. गल्लीत कुणालाही असं वाटलं नव्हतं. आता हे समोर आल्यावर सगळेजण आश्चर्याने विचारताहेत की, तो असं करुच शकत नाहीत. तो घरात लॅपटॉपवर अभ्यास करायचा, आम्हाला याबाबत माहिती नसल्यानं तो नेमकं काय करतोय? हे कसं कळणार, असंही झिशानच्या वडिलांनी सांगितलं होतं. VIDEO | UNCUT | प्रेमासाठी काहीही... पाकिस्तानला निघालेल्या तरुणाला कसं केलं ट्रेस? 17 तारखेला सीमा सुरक्षा दलाने झिशानला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पकडले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात मोटार सायकलवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले. झिशानचे वडील मौलाना आहेत. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. जाताना हा उस्मानाबाद ते अहमदनगर जिल्ह्यातील पर्यंत सायकलवर गेला. तिथून त्याने दुचाकी घेतली. याची माहिती कळाल्यावर एटीएस, सायबर, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई टीम कार्यान्वीत झाल्या. उस्मानाबाद, औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने शोध घेतला. त्याचा लॅपटाॅप तपासला गेला. तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे, हे लक्षात आल्यावर सीमेवर कळवले होते. हे ही वाचा-  प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला मुंबईकर हमीद सहा वर्षांनी मायदेशी हमीद अन्सारी सहा वर्षांनी पाकहून भारतात सुखरुप परत! सैन्य दलातील त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणांचा राजीनामा, आर्मी म्हणते चव्हाण दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget