एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुळजाभवानी मंदिरातील कर्मचाऱ्यांचा संप मागे, 1 हजाराची वेतनवाढ
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील 262 कर्मचारी कालपासून (6 नोव्हेंबर) संपावर गेले होते. हे कर्मचारी मंदिराची सुरक्षा आणि स्वच्छता करण्याचं काम करतात. संपावर गेलेल्यामध्ये 220 पुरुष आणि 42 महिलांचा समावेश होता.
उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिरातील स्वच्छता आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. दोन महिन्यांचे वेतन दिले नसल्यामुळे संपाचे हत्यार उपसले होते. सुट्ट्यांच्या हंगामात संपामुळे मंदिरात गोंधळ उडाला होता. अखेर 1 हजाराची वेतनवाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील 262 कर्मचारी कालपासून (6 नोव्हेंबर) संपावर गेले होते. हे कर्मचारी मंदिराची सुरक्षा आणि स्वच्छता करण्याचं काम करतात. संपावर गेलेल्यामध्ये 220 पुरुष आणि 42 महिलांचा समावेश होता.
मुंबईच्या क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नियुक्त केलेले हे कंत्राटी कर्मचारी आहेत. तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी मागणीनुसार कामगार पुरवण्याचे कंत्राट आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच मंगळवारी सकाळपासून या कंपनीच्या कामगारांनी अचानक काम थांबविल्याने गोंधळ उडाला होता.
कर्मचाऱ्यांनी या आहेत तक्रारी
- ऐन दिवाळीत गेल्या दोन महिन्यांपासून वेतन नाही
- केवळ सहा हजार रुपये मासिक वेतनावर काम
- पेमेंट स्लीप नाही, साप्ताहिक सुटी नाही
- पीएफ किती कपात होतो, किती जमा होतो, याची माहिती कंपनी देत नाही
- पगाराविषयी विचारणा केल्यास दमदाटी करून कामावरून काढून टाकले जाते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement