एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : पोलीस बदली अहवाल फुटी प्रकरण: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी

Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला.

Devendra Fadnavis : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी संपली आहे. फडणवीस यांची जवळपास दोन तास चौकशी सुरू होती. देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. पोलीस बदली अहवाल फुटला होता, त्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. याआधीदेखील फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. डीसीसी, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली. थोड्याच वेळेत देवेंद्र फडवणीस माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

मुंबई पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांना याआधीदेखील चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याला उत्तर दिले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी फडणवीस यांची आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी बारा वाजल्यापासून चौकशी सुरू केली.

मुंबई पोलिसांनी कोणते प्रश्न?

राज्य गुप्तचर विभागाची गोपनीय माहिती तुम्हाला कशी मिळाली? माहितीचा स्रोत काय? पेनड्राइव्हमधून आणखी काय माहिती मिळाली असे प्रश्न मुंबई पोलिसांनी विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फडणवीसांच्या घरात भाजप नेत्यांची गर्दी

मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या घरी चौकशी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज सकाळपासून भाजप नेत्यांनी फडणवीस यांच्या घरी गर्दी केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे आदींसह इतर नेते, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

भाजपकडून राज्यभरात आंदोलन

देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर भाजप आक्रमक झाली होती. मुंबईसह राज्यभरात भाजपकडून सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. नाशिक, बीड, नंदुरबार, अकोला, परभणी, हिंगोली, अमरावती बुलढाण्यासह यवतमाळमध्येही भाजपकडून सरकार आणि पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली.

फडणवीसांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीकडून भाजपवर टीका

पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी करण्यात आली. फडणवीस यांच्या चौकशीविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन केले. यावरूनच आता राज्यातील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्र्यांनी भाजपवर टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या चौकशी करण्यात आली, तेव्हा भाजप इतकी आक्रमक का झाली नाही, असा प्रश्न सरकारमधील काही मंत्र्यांनी केला आहे. यावरच बोलताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस केवळ माहिती घेणार आहेत, त्याचा इतका गोंधळ करायची काय गरज आहे?'' फडणवीस यांच्यावर निशाणा साधत छगन भुजबळ म्हणाले आहेत की, ''ईडी, आयकर विभाग, केंद्रीय तपास यंत्रणा यांचा वापर करता आणि इथं पोलिसांनी साधी माहिती घ्यायची नाही का?'' 

काही लोक स्वतःला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? : संजय राऊत 

देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीवरून सुरु असलेल्या गदारोळावरती शिवसेना नेते आणि खासदार यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?'' असा सवाल राऊत यांनी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
NCP Merger Controversy : दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर खोटं का बोललात? सुनील तटकरे, प्रफुल पटेलांच्या भूमिकेवर रोहित पवारांचा थेट सवाल
दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर खोटं का बोललात? सुनील तटकरे, प्रफुल पटेलांच्या भूमिकेवर रोहित पवारांचा थेट सवाल
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget