एक्स्प्लोर
नाशिक जिल्ह्यात आणखी एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
नाशिक : मालेगाव तालुक्यातील निंबळके गावात आणखी एका शेतकऱ्याने कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केली आहे. राकेश शेवाळे (वय-21 वर्ष) असं या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
धक्कादायक गोष्ट म्हणजे मालेगाव तालुक्यात 12 तासात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली आहे. आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी भेट घेऊन सांत्वन केलं.
मालेगाव तालुक्यातच नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वाके गावात ही घटना घडली. मनोज शांताराम सावंत असं 25 वर्षीय शेतकऱ्यांचं नाव आहे. शेततळ्याच्या पाण्यात उडी घेऊन मनोज सावंत यांनी आत्महत्या केली.
सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement