11 February In History : अमेरिकेचे संशोधक थॉमस एडिसन यांचा जन्म , महात्मा गांधीजींच्या ‘हरिजन’साप्ताहिकाची सुरूवात; जाणून घ्या आजच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना
On This Day In History : थॉमस अल्व्हा एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी झाला. त्यांनी बल्बचा शोध लावला. याबरोबरच महात्मा गांधीजी यांच्या ‘हरिजन’ या साप्ताहिकाचा पहिला अंक पुण्यातून 11 फेब्रुवारी 1933 रोजी प्रकाशित झाला.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या नेल्सन मंडेला यांना 27 वर्षांच्या तुरुंगवासानंतर 11 फेब्रुवारी 1990 रोजीच मुक्त करण्यात आले. देशद्रोह आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवून जून 1964 मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 11 फेब्रुवारी 1979 च्या दिवशी इराणचे अध्यात्मिक नेता अयातुल्ला खामेनी यांच्या समर्थकांनी इरानची राजधानी तेहरानवर ताबा मिळवला. या बरोबरच आजच्या दिवशी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना 30 वर्षांच्या सत्तेनंतर प्रचंड विरोधामुळे पायउतार व्हावे लागले होते.
1847 : अमेरिकेचे संशोधक थॉमस एडिसन यांचा जन्म
थॉमस अल्व्हा एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी झाला. त्यांनी बल्बचा शोध लावला. तसेच त्यांचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध प्रसिद्ध आहेत. ते फक्त तीन महिने शाळेत गेले. कारण शिक्षकांनी हा अतिशय "ढ" विद्यार्थी असून तो काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. त्यांनी आपल्या घराचा पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचचे काम केले. 1862 मध्ये एडिसन यांनी एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावले आणि त्या मुलाचे प्राण वाचवले. हा मुलगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसन यांच्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीनी यांनी त्यांना आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसन यांना रात्री झ़ोप येई, म्हणून त्यांनी तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन हे 1869 मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाले. पुढे त्यांनी असंख्य शोध लावले. त्यांच्या नावे 1093 पेटंट आहेत.
1933 : महात्मा गांधीजी यांच्या ‘हरिजन’ या साप्ताहिकाचा पहिला अंक पुण्यातून प्रकाशित झाला
महात्मा गांधीजी यांच्या ‘हरिजन’ या साप्ताहिकाचा पहिला अंक पुण्यातून 11 फेब्रुवारी 1933 रोजी प्रकाशित झाला. त्यांनी 1933 मध्ये 'हरिजन' या साप्ताहिकाचे इंग्रजीत प्रकाशन सुरू केले. हे साप्ताहिक पुढे 1948 पर्यंत चालू राहिले. त्यानंतर ते बंद झाले.
1942 : भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन
जमनालाल बजाज यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1889 रोजी झाता. ते भारतीय उद्योगपती, मानववंशशास्त्रज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक होते. ते महात्मा गांधींचे अनुयायी होते. गांधीजींनी त्यांना आपल्या मुलाप्रमाणे वागवले. आजही त्यांचा संचालित ट्रस्ट समाजसेवेच्या कार्यात आहे.
असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी इंग्रजांनी दिलेली रायबहादूर या पदवीवीचा त्याग केला.
1963 : सोव्हिएत युनियनमधून चार मिग लढाऊ विमाने मुंबईत दाखल
1962 च्या भारत-चीन युद्धापूर्वी सोव्हिएत युनियनने भारताला 12 मिग लढाऊ विमाने देण्याचा शब्द दिला होता. त्यातील पहिल्या तुकडीतील चार विमाने 11 फेब्रुवारी 1663 रोजी मुंबईत दाखल झाली.
1968 : तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते दीनदयाळ उपाध्याय यांचे निधन
दीनदयाल उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे नेते होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक कणखर विचारवंत, उत्कृष्ट संघटक आणि आयुष्यभर वैयक्तिक प्रामाणिकपणा आणि सचोटीला महत्त्व देणारे नेते होते. दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानववाद (अखंड मानववाद) या पुस्तकात साम्यवाद आणि भांडवलशाही या दोन्हींवर टीका केली आहे.
1977 : देशाचे तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांचे निधन
फखरुद्दीन अली अहमद यांजा जन्म 13 मे 1905 रोजी झाला. ते भारताचे पाचवे राष्ट्रपती होते. 1925 मध्ये इंग्लंडमध्ये नेहरूंना भेटल्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. 24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रुवारी 1977 पर्यंत ते राष्ट्रपती होते. राष्ट्रपती पदावर कार्यरत असतानाच 11 फेब्रुवारी 1977 रोजी त्यांचे निधन झाले.
1979 : अयातुल्ला खमेनी यांच्या समर्थकांनी इराणची राजधानी तेहरान ताब्यात घेतले
11 फेब्रुवारी 1979 च्या दिवशी इराणचे अध्यात्मिक नेता अयातुल्ला खामेनी यांच्या समर्थकांनी इरानची राजधानी तेहरानवर ताबा मिळवला. त्यापूर्वी त्यांना देशातून हकलून देल्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये आश्रय घेतला होता. त्यानंतर ते 14 वर्षांनी इराणला परतले. इराणमध्ये परतल्यानंतर दहाव्या दिवशीच त्यांनी इराणमध्ये सत्ता स्थापन केली.
1990: 27 वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका
दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या नेल्सन मंडेला यांना 27 वर्षांच्या तुरुंगवासानंतर 11 फेब्रुवारी 1990 रोजीच मुक्त करण्यात आले. देशद्रोह आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवून जून 1964 मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
1997 : भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत व्ही नारळीकर यांना युनेस्कोचा 'कलिंग पुरस्कार' प्रदान करण्यात आला
भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत व्ही नारळीकर यांना युनेस्कोचा 'कलिंग पुरस्कार' 11 फेब्रुवारी 1997 रोजी प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार 1996 सालासाठी देण्यात आला.
2011: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी 30 वर्षांच्या सत्तेनंतर राजीनामा दिला
आजच्या दिवशी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना 30 वर्षांच्या सत्तेनंतर प्रचंड विरोधामुळे पायउतार व्हावे लागले होते. इजिप्तमध्ये जवळपास 30 वर्षे सत्तेवर होते.