एक्स्प्लोर

22 November In History: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या, मद्रास राज्याचं नाव तामिळनाडू, आज इतिहासात

On This Day In History: 22 नोव्हेंबर 1968 साली मद्रास राज्याचं नाव बदलण्यात आलं आणि तामिळनाडू असं ठेवण्यात आलं. नंतरच्या काळात म्हणजे 1996 साली मद्रास शहराचं नावदेखील चेन्नई असं करण्यात आलं. 

मुंबई: आजचा दिवस इतिहासात अनेक घटनांचा साक्षीदार आहे. 22 नोव्हेंबर 1963 रोजी अमेरिकेचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या करण्यात आली. तसेच आजच्याच दिवशी 1968 रोजी मद्रास राज्याचं नाव बदलून तामिळनाडू असं करण्यात आलं. जाणून घेऊया इतिहासात आजचा दिवस का महत्त्वाचा आहे. 

1808- थॉमस कुक अॅन्ड सन्सचा संस्थापक थॉमस कुकचा जन्म 

जगातील सर्वात जुन्या ट्रव्हल कंपन्यांपैकी एक असलेल्या थॉमस कुक अॅन्ड सन्सचा (Thomas Cook & Son) संस्थापक थॉमस कुक याचा जन्म 22 नोव्हेंबर 1808 रोजी ब्रिटनमध्ये झाला. ट्रव्हलिंगमध्ये पॅकेज टूरची संकल्पना आणणाऱ्या आणि ती लोकप्रिय करणाऱ्या व्यक्तींपैकी थॉमस कुक हा एक होता. गेल्या काही वर्षांमध्ये ही कंपनी तोट्यात आल्याने कंपनीच्या ब्रिटनमधील शाखेला टाळं ठोकण्यात आलं. पण भारतातील शाखा मात्र सुरू असून मुंबईमध्ये त्याचं मुख्यालय आहे. 

1963- अमेरिकन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या

अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष  जॉन एफ केनेडी (John F. Kennedy) यांची 22 नोव्हेंबर 1963 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमउळे जागतिक महासत्ता असलेली अमेरिका चांगलीच हादरली. जॉन एफ केनेडी हे अमेरिकेचे 1961 ते 1963 या दरम्यान राष्ट्राध्यक्ष होते. केनेडी यांना ली हार्वे ओस्वाल्ड या व्यक्तीने दोनवेळा गोळ्या मारल्या. जॉन एफ केनेडी डॅलस, टेक्सासमधून जात असताना ही घटना घडली होती. राष्ट्राध्यक्षांचा मारेकरी असलेल्या ओस्वाल्डला दोन दिवसांनी एका नाईट क्लबच्या मालकाने गोळ्या घातल्या आणि त्याची हत्या केली. राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या हत्येमागे एक मोठा कट असल्याचा अनेकांचा विश्वास होता, पण काहीही सिद्ध होऊ शकले नाही

1968- मद्रास राज्याचं नाव बदलून तामिळनाडू ठेवण्यात आलं

स्वातंत्र्यपूर्व भारतातील दक्षिणेकडील प्रांत म्हणजे मद्रास प्रांत होय. ब्रिटिशांच्या काळात मद्रास प्रेसिडेन्सी असलेल्या प्रदेशात आंध्र प्रदेशाचा किनारपट्टी भाग, मलबार, कर्नाटक आणि तामिळनाडू यांचा समावेश होत होता. 1953 साली या भाषिक आधारावर आंध्रची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर या प्रदेशातून 1956 साली केरळ आणि म्हैसूर म्हणजे आताचं कर्नाटकची निर्मिती करण्यात आली. उरलेला प्रांत हा मद्रास राज्य या नावाने ओळखला जायचा. आजच्याच दिवशी म्हणजे 22 नोव्हेंबर 1968 साली मद्रास राज्याचं नाव बदलण्यात आलं आणि तामिळनाडू असं ठेवण्यात आलं. नंतरच्या काळात म्हणजे 1996 साली मद्रास शहराचं नावदेखील चेन्नई असं करण्यात आलं. 

1986- ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस याचा जन्म 

ब्लेड रनर म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा अपंग धावपटू 
ऑस्कर पिस्टोरियस (Oscar Pistorius) याचा आजच्या दिवशी, 22 नोव्हेंबर 1986 रोजी जन्म झाला. पॅरालिम्पिकमध्ये ऑस्कर पिस्टोरियसने सहा सुवर्णपदकं मिळवली आहेत. त्यानंतर तो 2012 साली लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा पहिला अपंग खेळाडू ठरला. 
ऑस्कर पिस्टोरियसवर 2013 साली त्याच्या गर्लफ्रेण्डच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 

1997- डायना हेडन मिस वर्ल्ड

डायना हेडन (Diana Hayden) हिची ओळख भारतीय विश्वसुंदरी आणि मॉडेल अशी आहे. फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकुट जिंकणाऱ्या डायनाने त्याच वर्षी म्हणजे 22 नोव्हेंबर 1997 रोजी सेशेल्समध्ये पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकणारी डायना हेडन ही तिसरी भारतीय ठरली. त्या आधी रिटा फारिया आणि ऐश्वर्या राय यांनी हा खिताब पटकावला होता. 

2000- पाकिस्तान आणि इराणवर अमेरिकेचे निर्बंध

अणवस्त्रांचा विकास कार्यक्रम सुरू ठेवणाऱ्या पाकिस्तान आणि इराणवर अमेरिकेने 22 नोव्हेंबर 2000 रोजी निर्बंध लादले. या दोन्ही देशांमध्ये छुप्या पद्धतीने अणवस्त्र विकासाचा कार्यक्रम सुरू असल्याचा युरोपियन देशांचा संशय होता. त्यातून पाकिस्तानने अणवस्त्र विकास तंत्रज्ञान इराणला दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अमेरिकेने आणि युरोपियन देशांनी या दोन्ही देशांवर निर्बंध लादले. 

2005- अॅंजेला मर्केल जर्मनीच्या पहिल्या महिला चॅंन्सेलर

अॅंजेला मर्केल (Angela Merkel) यांची 22 नोव्हेंबर 2005 रोजी जर्मनीच्या चॅन्सेलरपदी निवड करण्यात आली होती. अॅंजेला मर्केल या जर्मनीतील ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाच्या नेत्या आहेत. 2005 ते 2021 अशा प्रदीर्घ कालावधीसाठी त्यांनी जर्मनीचे नेतृत्व केलं. चॅन्सेलरपदावर निवड झालेल्या त्या पहिल्याच महिला होत्या. फिजिकल केमेस्ट्रीमध्ये डॉक्टरकीची पदवी मिळवलेल्या मर्केल यांची 1990 मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नमधून जर्मनीच्या संसदेवर पहिल्यांदा निवड झाली. त्यानंतर त्यांनी जर्मन सरकारमध्ये महिला व बाल मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय अशी खाती सांभाळली. 2005 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून त्या  चॅन्सेलरपदावर बसल्या. मर्केल या युरोपियन युनियनमधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानल्या जायच्या. 2009 साली भारत सरकारने त्यांना जवाहरलाल नेहरू पुरस्काराने सन्मानित केलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Embed widget