एक्स्प्लोर

बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदान, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना झटका

लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थेला बोगस कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या अनुदान प्रकरणात तथ्य असल्याचे समोर आले आहे. 25 कोटींपैकी 5 कोटी अनुदानाची रक्कम दूध भुकटी प्रकल्पासाठी मिळाली होती ती परत घेण्याबाबत दुग्धव्यवसाय आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : लोकमंगल संस्थेने बोगस कागदपत्रांच्या आधारे दुध भुकटी कारखान्यासाठी 25 कोटी रुपये अनुदान लाटल्याप्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना चांगलाच झटका बसला आहे.  लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थेला बोगस कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या अनुदान प्रकरणात तथ्य असल्याचे समोर आले आहे. 25 कोटींपैकी 5 कोटी अनुदानाची रक्कम दूध भुकटी प्रकल्पासाठी मिळाली होती ती परत घेण्याबाबत दुग्धव्यवसाय आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदान, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना झटका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. सुभाष देशमुख यांच्या संस्थेने बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. राज्य सरकारकडून राष्ट्रीय विकास कार्यक्रमाअंतर्गत कृषी संस्थांना अनुदान मिळते. याचा फायदा घेत सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट सहकारी संस्थेला 24.81 कोटीचं अनुदान मंजूर झालं त्यातीत पाच कोटी त्यांच्या संस्थेला मिळाले होते.बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदान, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना झटका तसेच दुध भुकटी बनवण्यासाठी ज्या संस्थांची नावे दिली त्या बंद आहेत, तर काही संस्था अस्तित्वातचं नाही. अनुदान मिळवण्यासाठी जी कागदपत्र सादर करण्यात आली ती देखील बनावट असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला होता.  त्यामुळे आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली होती. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला समंतीपत्र देशमुखांच्या संस्थेने सादर केले होते. मात्र ते बनावट असल्याचं प्रदुषण मंडळाने स्पष्ट केलं आहे. याशिवाय अकृषीक प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं नसल्याने तेही बनावट असून त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा खोट स्टॅम्प असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदान, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना झटका लोकमंगलने दूध भुकटीसाठी बनावट कागदपत्रे सादर करुन अनुदान लाटल्याप्रकरणी चौकशीचे निर्देश देणाऱ्या, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त आर.आर. जाधव यांची बदली करण्यात आली होती. जाधव यांची बदली केल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केद्र सरकारला फटकार
Sangola Drought : सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Embed widget