ढोल ताशा पथक पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगावला निघालं, बस दरीत कोसळली अन् रस्त्यातच मृत्यूनं गाठलं; मुंबईच्या प्रवाशांवर काळाचा घाला
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या खासगी बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते.
Old Pune-Mumbai Highway Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या खासगी बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. हे सगळे प्रवासी झांज वादक आणि कलाकर होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटपून गोरेगावला निघाले असता त्यांची खासगी बस दरीत कोसळली आणि त्यातील 11 जणांना मृत्यूने गाठलं तर इतर लोक गंभीर जखमी झाले आहेत.
खाजगी बसमध्ये बाजी प्रभू वादक गट (झांज पथक) गोरेगावमधील (Mumbai) कलाकर प्रवासी होते. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. त्यांना लगेच मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीमने बाहेर काढले. यात 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे
1) आशिष विजय गुरव,19 वर्षे, दहिसर मुंबई
2) यश अनंत सकपाळ, वय 17 वर्ष, गोरेगाव, मुंबई
3) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई
4) वृषभ रवींद्र कोरमे, वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई
5) रुचिका सुनील डुमणे, वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई
6) आशिष विजय गुरव, वय 19 वर्ष, दहिसर, मुंबई
7) ओंकार जितेंद्र पवार, वय 25 वर्षे खोपोली, रायगड
8) संकेत चौधरी, वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई
9) रोशन शेलार, वय 35 वर्ष, मुंबई
10) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई
11) निखिल संजय पारकर, वय 18 वर्ष, मुंबई
12) युसुफ मुनीर खान, वय 13 वर्ष, मुंबई
13) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई
14) अभिजीत दत्तात्रेय जोशी वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई
16) मोहक दिलीप सालप, वय 18 वर्षे, मुंबई
17) दिपक विश्वकर्मा, वय 20 वर्ष, गोरेगाव, मुंबई
18) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, वय 18 वर्ष, गोरेगाव, मुंबई
खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधील जखमींची नावे
1) नम्रत रघुनाथ गावनुक, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई
2) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई
3) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई
4) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 वर्ष, विरार
5) महेश हिरामण म्हात्रे, वय 20 वर्षे, गोरेगाव, मुंबई
6) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई
7) शुभम सुभाष गुडेकर, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई
8) ओम मनीष कदम, वय 18 वर्ष, गोरेगाव, मुंबई
9) मुसेफ मोईन खान,वय 21 वर्ष, गोरेगाव, मुंबई
खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालय खोपोली जखमीचे नाव
1) सनी ओमप्रकाश राघव, वय 21 वर्ष, खोपोली,रायगड.
खालापूर रुग्णालयात मयत नावे
1) जुई दीपक सावंत, वय 18 वर्ष, गोरेगाव, मुंबई
खासगी रुग्णालयाकडून लगेच मदत
अपघातानंतर लगेच बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. बचावकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीमने लगेच अनेक प्रवाशांना बाहेर काढलं. त्यावेळी जवळच्या अनेक खासगी रुग्णालयांना पाचारण करण्यात आलं होतं. या सगळ्यांनी प्रसंगावधान राखल्याने अनेकांचा जीव वाचला.