एक्स्प्लोर
साताऱ्यात टँकरला अपघात, कच्च्या तेलासाठी लोकांची झुंबड
![साताऱ्यात टँकरला अपघात, कच्च्या तेलासाठी लोकांची झुंबड Oil Tankers Collide On Road People Rush For Oil साताऱ्यात टँकरला अपघात, कच्च्या तेलासाठी लोकांची झुंबड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/12132711/Satara_Oil_Tancker.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : साताऱ्यातील मांडवे वडुज रस्त्यावर कच्च्या तेलाच्या टँकरला अपघात झाला. आश्चर्याची बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर तेल लुटण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.
झोप सहन न झाल्याने चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. अपघातानंतर चालक तिथून पसार झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील लोक अपघातस्थळी दाखल झाले. टँकरमधून तेल गळत असल्याचं पाहिल्यानंतर लोकांनी हंडे, किटल्या आणून तेल भरुन नेलं. काहींनी तर कॅनमधील दूध ओतून त्यात तेल भरुन नेलं.
दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याठिकाणी धाव घेतली. पोलिस पोहोचल्यावर त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)