(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनसे नाही तर आरपीआय आहे 'भाजपची बी टीम': रामदास आठवले
RPI Is BJP B Team: राज ठाकरे यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यांनी मंदिरांवर भोंगे लावायचे असतील तर लावावे, मात्र मशिदीवरील भोंगे काढण्याच्या त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे : आठवले
RPI Is BJP B Team: महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची आपली भूमिका बदलली असून त्यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. यावरच विरोधकांनी टीका करत राज ठाकरे हे भाजपने लिहून दिलेले कागद वाचत असून मनसे ही भाजपची 'बी टीम' असल्याचा दावा केला आहे. आता याच वादात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले आहते की, ''मनसे नाही तर आरपीआय भाजपची बी टीम आहे.'' गोंदिया जिह्याच्या दौऱ्यावर असलेले आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटले आहेत.
राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा नाही
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवर बोलता रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यांनी मंदिरांवर भोंगे लावायचे असतील तर लावावे, मात्र मशिदीवरील भोंगे काढण्याच्या त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही विरोध होता. धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असं माझं मत असल्याचं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, भाजपने भोंगे काढा अशी भूमिका घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका ही सबका साथ सबका विकास अशी आहे. राज ठाकरे यांना राजकारणात यश मिळत नसल्याने ते अशी उलटसुलट भूमिका घेत आहेत, असं आठवले म्हणाले आहते.
सरकार पडलं तर नवीन सरकार बनू
सरकार पडलं तर नवीन सरकार बनू, असं आठवले म्हणाले होते. यावरच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले आहेत की, सरकार एकदा पडलं. तर ज्यावेळी विश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार, तेव्हा अनेक सरकारमधील आमदार अनुपस्थित राहतील आणि त्यामुळे आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू. यानंतर पुढील अडीज वर्ष सरकार चालू, असं ते म्हणाले. कोणत्या पक्षाचे आमदार अनुपस्थित राहतील असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नाराज आहे. शिवसेनामधीलही बरेच आमदार नाराज आहे. शिवसैनिकांमध्ये अनेक लोकांची अशी भावना आहे की, आपण भाजपसोबत जायला हवं. यामध्येच बरेच शिवसेनेचे आमदार ही अनुपस्थित राहातील आणि पुढे आम्ही अडीज वर्ष सरकार चालू.
महत्त्वाच्या बातम्या:
- Raju Shetti : विधानपरिषद सदस्यत्व स्वीकारणं नैतिकदृष्ट्या योग्य नाही, 12 आमदारांच्या यादीतून नाव वगळण्याची शेट्टींची राज्यपालांना विनंती
- Ahmednagar Hospital Fire : राज्यपालांनी विशेषाधिकार वापरुन डॉ. पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं नाही : राजभवन
- राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार कपात करणाऱ्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी