एक्स्प्लोर

Nitin Gadkari : सोलापुरात आठ हजार कोटींच्या चार महामार्गांचे नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण

Nitin Gadkari News : सोलापुरात तयार करण्यात आलेल्या तब्बल आठ हजार कोटी रुपयांच्या चार महामार्गाचे लोकार्पण आणि 164 कोटी रुपयांच्या सहा महामार्गावरील प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.

Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कार्यक्रम पार पडला. सोलापुरात तयार करण्यात आलेल्या तब्बल आठ हजार कोटी रुपयांच्या चार महामार्गाचे लोकार्पण आणि 164 कोटी रुपयांच्या सहा महामार्गावरील प्रकल्पांचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

या महामार्गांचे लोकार्पण
1) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - १५० ई

अक्कलकोट-सोलापूर कि. मी. ९९/४०० ते कि. मी. १३८/३५२ लांबीचे चौपदरीकरण 

किमी - 38.952
किंमत - 1515.15 कोटी

2) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- १६६
वाटंबरे - मंगळवेढा कि.मी. २७६/००० ते कि.मी. ३२१/६०० लांबीचे चौपदरीकरण  

किमी - 45.60
किंमत - 2250.54 कोटी 

3) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - १६६ मंगळवेढा-सोलापूर कि.मी. ३२१/६०० ते कि.मी. ३७८/१०० लांबीचे चौपदरीकरण  

किमी -55.80
किंमत - 2272.54 कोटी 

4) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- १३ (नवीन रा.म.क.५२)
सोलापूर विजयपूरा कि.मी. ०/००० कि.मी. ११०/५४२ लांबीचे चौपदरीकरण 

किमी - 109.075
किंमत - 1979.44 कोटी

एकूण किमी - 249.427 किमी 
एकूण किंमत - 8017.30 कोटी
 
या मार्गाचं झालं भूमिपूजन  
 
1) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५
पुणे-सोलापूर महामार्गावर आढेगांव जंक्शन कि.मी. १६३/६०० व मोहोळ जंक्शन कि.मी २१७/५६५ येथे भूयारी मार्ग बांधणे

लांबी - 2 किमी
किमंत - 44.26 कोटी

राष्ट्रीय महामार्ग - सार्वजनिक बांधकाम विभाग माध्यमातून 

1) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५२
सोलापूर- विजयपूरा किमी ०/६२० मध्ये छोटा पुल बांधणे.
1 पूल
3 कोटी 95 लाख 

2) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५२
सोलापूर- विजयपूरा (सोलापूर शहर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ बायपासला जोडणारा) किमी १०/००० ते १३/३९० मध्ये चौपदरीकरण करणे.

लांबी - 3.39 किमी
किंमत - 29 कोटी 12 लाख 

3) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६५

पुणे-सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर किमी २४६/७५० (जमखंडी पुल) मध्ये छोटा पुल बांधणे.

1 पूल
2 कोटी 68 लाख 

4) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५

मोहोळ - कुरुल- कामती- कणबस-आचेगांव-वळसंग- धोत्री- मुस्ती-तांदुळवाडी किमी ५६/४०० ते ७६/००० (बंकलगी-कणबस तिलाटी गेट) आणि किमी ८६/७९० ते ९८/४०० (वळसंग-दिंडुर - धोत्री) मध्ये रुंदीकरण व मजबुतीकरण करणे.

लांबी - 26.610 किमी
किंमत - 54 कोटी 7 लाख 

5) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५२

सोलापूर- विजयपूरा किमी ० /००० ते १०/००० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (सोलापूर शहर)

लांबी - 10 किमी
किंमत - 29 कोटी 64 लाख

एकूण लांबी - 42 किमी
किंमत - 163 कोटी 72 लाख

सोलापूर ते पुणे,  सोलापूर ते विजापूर रस्ता 6 लेन करण्यासाठी लवकर निर्णय 

गडकरी म्हणाले की, सोलापूर ते पुणे 6 लेन करण्याची मागणी आहे. दिल्लीला गेल्यानंतर तात्काळ डीपीआर तयार करून घेईन.  सोलापूर विजापूर रस्ता लवकरच 6 लेन करण्यासाठी लवकर निर्णय घेऊ असंही ते म्हणाले. मागे सोलापूरला आलो असताना अनेक घोषणा केल्या होत्या.  त्यापैकी अनेक घोषणा पूर्ण झाल्या.  महाराष्ट्रामधील सर्वात जास्त काम सोलापुरात झाले असावीत असा माझा अंदाज आहे.  जुना पूना नाका ते सात रस्ता पूल निविदा प्रक्रिया सुरु आहे, असं गडकरी म्हणाले. 

गडकरी म्हणाले की,  चेन्नई सुरत मार्गांवर जाताना लॉजिस्टिस्क, इंडस्ट्री पार्क उभारा, विकास होईल.  हा देशातला महत्वाचा हायवे असेल. मनालीमध्ये तयार करण्यात आलेल्या अटल टनेलमुळे 3 तासाचा वेळ केवळ 9 मिनिटात पूर्ण होतोय. आम्ही भूसंपादनासाठी 17 हजार कोटी रुपये दिले. भुसंपादन रक्कम वाढावी म्हणून महाराष्ट्रमध्ये काही जणांनी झाडं लावली आहेत म्हणून ऐकलं.  आम्ही काय असले धंदे करणार नाही, असंही ते म्हणाले. इथं भाषणात ज्या ज्या आमदारांनी खासदारांनी मागण्या केल्या आहेत. त्या सर्व मंजूर करण्याची घोषणा मी या ठिकाणी करतो, असंही ते म्हणाले.  

इलेक्ट्रिक केबलवर बस, ट्रक चालतील असे प्रयत्न आहेत. पायलट प्रोजेक्ट सुरु आहे. यासाठी सोलापूरमधून प्रस्ताव पाठवा, लोकांना एसी गाडीमधून फिरवा.  मी केवळ आश्वासन देत नाही आणि दिलं तर ते पाळतोच. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे घेऊन जातोय. राज्य सरकारने हायवेच्या बाजूला जागा दिली तर लॉजिस्टिक पार्क बांधू, असंही ते म्हणाले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषदAjit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...Job Majha | DFCCIL मध्ये ज्युनियर मॅनेजर पदावर भरती, अर्ज कसा करायचा? ABP MajhaCM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.