Nitin Gadkari: राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता म्हणून कमी होत चाललीय, नितीन गडकरींनी कारण सांगून टोचले राजकारण्यांचे कान
Nitin Gadkar : राजकारणी जसे बोलतात तसे वागत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. असे मत व्यक्त करत नितीन गडकरी यांनी राजकारण्यांचे कान टोचले आहेत.
Nitin Gadkar नागपूर : राजकारणी जसे बोलतात तसे वागत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे, असे अनेकांना वाटतं. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे मत व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राजकारण्यांचे कान टोचले आहेत. ते नागपुरातील (Nagpur) सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय महानुभाव पंथीय संमेलनात बोलत होते.
जो म्हणणार जात त्याला बसणार लात- नितीन गडकरी
लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारात बोललो, जातपात पाळत नाही, मला वोट द्या, किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लात, असंही बोललो होतो. चक्रधर स्वामी यांनी ही हाच संदेश दिला होता. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हे सर्व भेद संपले पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केलं पाहिजे, असे गडकरी म्हणाले.
राजकारण्यांनी चांगलं काम करावं, जनतेचा आशीर्वाद पाठीशी कायम राहतो. काम असे करावं की काम केल्यानंतर कोणालाच कळलं नाही पाहिजे, मात्र, आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे नेते ही आहेत. असे सांगून गडकरींनी राजकारण्यांना चांगलाच टोला हाणलाय.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे- परिणय फुके
तर याच कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा भाजप आमदार परिणय फुके यांनी जाहीर रित्या बोलून दाखवली आहे. नागपुरातील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात आमदार परिणय फुके यांनी काल( शनिवारी) हे वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यावेळी मंचावर उपस्थित असताना फुके यांनी हे वक्तव्य केलंय. फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहे, तरी ते ही एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार. फडणवीस यांचं महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहे. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणूकीत आशिर्वाद दिला तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असेही परिणय फुके म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या उज्वल भविष्याकरता नितीन गडकरी मैदानात, महायुतीचे सरकार आणण्याकरता महिनाभर वेळ देणार: चंद्रशेखर बावनकुळे
- Imtiaz Jaleel: मविआसोबतच्या युतीबाबत जलील यांचा गौप्यस्फोट; नेत्यांसोबत चर्चा झाल्याची कबुली पण...; स्टेजवर जागा देण्यावर निर्णय होत नसल्याचा दावा