एक्स्प्लोर

विधानसभेच्या रणांगणात भावा-भावांची दुसरी जोडी मैदानात, निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करुन निवडणूक लढवणार!

भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Ran) हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत.

Nilesh Rane to join Shiv Sena : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे (Nilesh Ran) हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (23 ऑक्टोबर) 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आभार मानले. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत 

गेले अनेक दिवस निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. आज अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. 2019 ला नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या सोबत ते भाजपमध्ये आले होते. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे म्हणाले. नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार असल्याचे निलेश राणे म्हणाले. पक्ष हितासाठी जे करता येईल ते करणार आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत, ते कायम दैवत राहणार असल्याचे राणे म्हणाले. 

पक्ष हितासाठी जे करायचं ते मी करेन

माझ्या घरात अनेक वर्षे लाल दिवा होता. मी कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी निवडणूक लढणार असल्याची माहिती निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्ष हितासाठी जे करायचं आहे ते मी करेन असंही ते म्हणाले. निलेश राणे उद्याचा केव्हाही विचार करत नाही. मी जसा आहे तसा आहे. उद्या भरगच्च कार्यक्रम होणार आहे. प्रेमापोटी ज्यांना ज्यांना यायचं आहे ते येणार असल्याचे राणे म्हणाले. कुडाळमध्ये मोठा कार्यक्रम घेणार आहे. मी लहान कार्यकर्ता आहे, मला निवडणूक लढायची असल्याचे राणे म्हणाले. 

निलेश राणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार अशी पत्रकार परिषदेत घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांच्या सोशल मीडियावरील भाजप चिन्हाचे असलेले पोस्टर्स हटवले आहे. आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह असलेले पोस्टर्स त्यांनी अपलोड केले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार, शिंदेंची भेट घेतली; कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी; सूत्रांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : 6 जागांवर मविआत वाद; कुर्ल्याच्या जागेवर मविआतल्या तीनही पक्षांचा दावाMahayuti Vidhan Sabha : महायुतीतल्या 24 तासांतल्या घडामोडी;काल अजितदादांशिवाय बैठक, दादा आज दिल्लीलाMaharashtra Politics : राणे, नाईक ते महाडिक... एक घर दोन पक्ष Special ReportABP Majha Headlines : 03 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
Embed widget