एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवडणूक लढवायला हिंमत लागते, आदित्यच्या निवडणूक लढवण्यावर निलेश राणेंची टीका
लोकसभेच्या विजयानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असताना नीलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. “निवडणूक लढवायला हिंमत लागते. विजय किंवा पराभव होत असतो पण दुसऱ्यांच्या लाटेवर निवडून येणारे फक्त टिकिट वाटप करु शकतात.” असं ट्वीट करतं नीलेश राणे आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
लोकसभेच्या विजयानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असताना नीलेश राणे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. यापूर्वीही आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली होती. तसेच त्यांच्यासाठी उत्तर मध्य मुंबईतून आणि उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्यासाठी तयारी देखील केली होती. एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील सक्रिय राजकारणात उतरले असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील लोकसभा लढवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. VIDEO | आदित्य ठाकरे विधानसभा लढणार? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझानिवडणूक लढवायला हिम्मत लागते... विजय किव्हा पराभव होत असतो पण दुसऱ्यांच्या लाटेवर निवडून येणारे हिजड्यांसारखे फक्त टिकिट वाटप करू शकतात. https://t.co/N0LeVKuaR2
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 28, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement