निलेश लंके मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला, रुग्णालयात जाऊन केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले आरक्षणावर तोडगा निघालाच पाहिजे
Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा प्रश्न हा लोकसभेत बोलावाच लागेल, या मायबाप जनतेमुळे मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली, असे निलेश लंके म्हणाले.
![निलेश लंके मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला, रुग्णालयात जाऊन केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले आरक्षणावर तोडगा निघालाच पाहिजे Nilesh Lanke Met Manoj Jarange in Hospital Chhatrapati Sambhajinagar Maratha Reservation Maharashta Marathi News निलेश लंके मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला, रुग्णालयात जाऊन केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले आरक्षणावर तोडगा निघालाच पाहिजे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/e67369e9b90660c25684f05959202c63171851457692689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lamke) यांनी संभाजी नगरमध्ये मरठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना मी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर तोडगा निघाला पाहिजे , अशी मागणी करणार आहे.
मनोज जरांगे म्हणाले, जरांगे पाटलांनी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढा उभा केलेला आहे आणि तो लढा उभा करत असताना स्वतःच्या जीवाची परवा न करता केली आहे. लढा उभा करताना त्यांचे वजन 51 किलो होते. मध्यंतरी उपोषणामध्ये 42 किलो वजन त्यांचं झालं होतं मात्र आता 36 किलो वजन झालं आहे. त्यांच्याजवळ मागण्या आहेत त्यावर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा. केव्हापर्यंत भिजत घोंगड आपण ठेवणार कधी तरी यावर तोडगा निघायला जावा शेवटी समाजासाठी लढणारा माणूस आहे.
लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे : निलेश लंके
सगे सोयरेच्या मागणीवर बोलताना जरांगे म्हणाले, कागदोपत्री या सर्व गोष्टींची पळवाटा सांगण्यापेक्षा लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. आपण किती वेळा कुठले तरी मुद्द्यावर कागदपत्र गोळा करतात ही पळवाट काढण्यापेक्षा आता निर्णयाकडे सरकारने जावे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा लोकसभेत बोलावाच लागेल, या मायबाप जनतेमुळे मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली. नक्कीच हा प्रश्न उपस्थित केला जाईल आणि कशाप्रकारे जरांगे पाटील ही लढाई लवकरात लवकर जिंकतील यासाठी ही प्रश्न उपस्थित करणार आहे.
माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांचा फायदा झाला : निलेश लंके
लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फायदा झाला का, यावर बोलताना निलेश लंके म्हणाले, माझ्या मतदारसंघात देखील जरांगे पाटील यांच्यामुळे फायदा झाला.
जरांगे यांचे उपोषण एक महिन्याकरता स्थगित
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण एक महिन्याकरता स्थगित केलं आहे. जरांगेंनी सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ दिला आहे. एक महिन्यात सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपण स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरणार असा इशारा जरांगे यांनी दिला. राज्य सरकारचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंची समजूत काढली. आचारसंहितेमुळे दोन महिने काम ठप्प होतं, त्यामुळे सरकारला एक महिन्याचा वेळ द्या अशी विनंती जरांगेंनी केली. ही विनंती जरांगेंनी मान्य केली.
हे ही वाचा :
OBC Reservation: सगेसोयरेचा जीआर काढलात, ओबीसी आरक्षणाला विरोध केलात तर विधानसभा निवडणुकीत पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)