NIA Raid : एनआयएची आयसीसवर मोठी कारवाई, देशभरात 44 ठिकाणांवर एनआयएचं धाडसत्र
आयसीसशी संबंधांच्या (ISIS Conspiracy Case) आरोपांवरून एनआयएने ठाणे जिल्ह्यासह (Thane NIA Raid) देशात मोठी कारवाई केली आहे.

Background
NIA Raid: आयसीसशी संबंधांच्या (ISIS Conspiracy Case) आरोपांवरून एनआयएने ठाणे जिल्ह्यासह (Thane NIA Raid) देशात मोठी कारवाई केलीय. देशात एनआयएने 44 ठिकाणी छापे मारले. त्यातले एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. पडघ्यात 31 ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर 14 जणांना ताब्यात घेतलंय. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करणयात आले आहे. साकीब नाचण याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होताा. पुणे आयसीस प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचणचा मुलगा शामील नाचण याला अटक केली होती. आता या सर्वांना एनआयएने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केलीय.
NIA Raid: NIA कडून 15 जणांना ताब्यात, दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर करणार
NIA Raid: NIA ने आता पर्यंत 15 जणांना ताब्यात घेतले आहे. या 15 जणांना अटक दाखवली आहे. या सर्व आरोपींना घेऊन NIA दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर करणार आहे. विमानाच्या माध्यमातून या आरोपीना दिल्ली पटियाला येथे घेऊन जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे साकिब नाचन हा मुख्य सूत्रधार असून त्या सोबत 14 जणांना ताब्यात घेतले आहे.
Rabodi NIA Raid: ठाण्यातील राबोडी परिसरामधील बापे कुटुंबावर NIA ची धाड
Rabodi NIA Raid: NIA च्या वतीने ठाण्यातील राबोडी परिसरामधील चांदीवला या इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहत असणाऱ्या बापे कुटुंबावर NIA धाड टाकली. चार ते आठ दरम्यान चौकशी केली आहे.बापे कुटुंबातील एका सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वांचे मोबाईल तपासलले गेले आहेत. येथे काहीही मिळाले नसून चार ते आठ वाजे पर्यंत चौकशी केली आहे.अंजुम बापे हे आर्किटेक असून त्यांची कागदपत्र तपासणी केली त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन जप्त करून चौकशीसाठी घेऊन गेले आहे
























