एक्स्प्लोर
बीडमध्ये रस्त्याशेजारी सापडलेल्या नवजात अर्भकाचा अखेर मृत्यू
बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी शिवारातील कनसेवाडी रस्त्यावर सापडलेल्या नवजात अर्भकाचा अखेर मृत्यू झाला आहे. आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जिवंत स्ञी जातीचे अर्भक आढळून आलं होतं.

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी शिवारातील कनसेवाडी रस्त्यावर सापडलेल्या नवजात अर्भकाचा अखेर मृत्यू झाला आहे. आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जिवंत स्ञी जातीचे अर्भक आढळून आलं होतं. बीडसांगवी शिवारातील कनसेवाडी रस्त्यावर काल (मंगळवारी) रात्री अज्ञात व्यक्तीने जिवंत स्त्री अर्भक फेकून दिलं होतं. आज सकाळी एका गुराख्याला या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, तेव्हा त्याला नुकतंच जन्मलेलं स्त्री अर्भक आढळून आलं. त्यांनी ही माहिती तातडीने गावात कळवली. या नवजात अर्भकाची बेंबीपासून नाळ तोडल्यामुळे रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे अर्भकास आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्याला शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयातील शिशू कक्षात दाखल करण्यात आले. यावेळी त्याचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर असल्याचे समोर आलं. अखेर उपचारा दरम्यान या अर्भकाचा मृत्यू झाला आहे. पोलीस आता अर्भकाच्या आईचा शोध घेत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























