एक्स्प्लोर

New Year 2023: पुणेकरांनो 'या' मंदिरांना भेट द्या अन् नव्या वर्षाची सुरुवात करा

नववर्षानिमित्त अनेक पुणेकर पुण्यातील महत्वाच्या मंदिरांना भेट देतात. येणारं वर्ष नीट जाण्यासाठी तुम्हीही पुण्यातील या मंदिराला भेट द्यायला हरकत नाही.

Pune famous Temple : नवीन वर्षाच्या (Pune) स्वागतासाठी पुणेकर ( famous Temples in Pune ) सज्ज झाले आहे. नवीन वर्ष म्हटलं कि अनेकजण वेगवेगळे निश्चय करतात. येणारं वर्ष सुख समाधानाने जाऊ दे, यासाठी देवाकडे साकडं घालतात. त्यामुळे अनेक पुणेकर पुण्यातील महत्वाच्या मंदिरांना भेट देतात. येणारं वर्ष नीट जाण्यासाठी तुम्हीही पुण्यातील या मंदिराला भेट द्यायला हरकत नाही...

दगडूशेठ गणपती मंदिर (dagdusheth temple)

प्रत्येक पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजे दगडूशेठ गणपती. कोणत्याही कामाची सुरुवात असो किंवा स्वप्नपूर्ती असो प्रत्येक पुणेकर नतमस्तक होण्यासाठी दगडूशेठ चरणी जात असतात. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी तुम्ही दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जायला हवं.

ठिकाण : शिवाजी रस्ता, पुणे

सारसबाग गणपती मंदिर (sarasbaug temple)

सारसबाग गणपती मंदिराला तळ्यातला गणपतीचं मंदिर म्हणूनही ओखळलं जातं. मंदिर परिसरात मोठी बाग आहे. साकडं पूर्ण करणारा जागृत मंदिर म्हणूनही या मंदिराची ओळख आहे. मंदिराचा गणपती पांढऱ्या गारेचा आणि आकर्षक आहे. अनेक पुणेकर साकडं घालण्यासाठी या मंदिराला भेट देतात. 

ठिकाण : स्वारगेट पुणे

ओंकारेश्वर मंदिर (Omkareshwar temple)

भगवान शिवाला समर्पित, ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. पेशव्यांच्या राजवटीत बांधण्यात आलेले हे मंदिर शहरातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मुख्य मंदिरात भगवान शिवाच्या मूर्तीशिवाय, लहान मंदिरे देखील आहेत .ज्यात भगवान गणेश, देवी दुर्गा, भगवान शनी, भगवान विष्णू आणि भगवान हनुमान यांच्या मूर्ती आहेत. अनेक शंकराची पूजा करणारे आवर्जून या मंदिराला भेट देतात. 

ठिकाण: चंद्रशेखर गोविंद आपटे रोड, शनिवार पेठ, पुणे

कसबा गणपती मंदिर (Kasba Temple)

पुण्यातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. मानाचा पहिला गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत अशी या मंदिराची ओळख आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान या मंदिर परिसरात सण साजरे करण्यास सुरुवात केल्यानंतर ते लोकप्रिय झाले. तेव्हापासून हे मंदिर गणपतीशी संबंधित उत्सवासाठीही महत्त्वाचे बनले आहे. मंदिराचे वैभव पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात. 

ठिकाण: कसबा पेठ रोड, फडके हौद, कसबा पेठ, पुणे

पर्वती (Parvati hills)

नावाप्रमाणेच हे मंदिर समुद्रसपाटीपासून 2100 फूट उंच डोंगरावर आहे. पुण्यातील या सुंदर मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला 103 पायऱ्या चढाव्या लागतील. नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी व्यायामाचं नियोजन केलं असेल तर पर्वतीला जायलाच हवं. 

ठिकाण: पार्वती पायथा, पुणे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
Embed widget