डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू
निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूनंतर पालकांना 50 हजार रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न डॉक्टरने केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
पालघर : पालघरच्या बोईसरमध्ये डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. मात्र बाळाच्या पालकांना 50 हजार रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न डॉक्टरने केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
बोईसर सरावली येथील डॉक्टर हेमंतकुमार निगवे यांच्या साक्षी हॉस्पिटलमध्ये सोनी चौहान या महिलेनं 21 जुलैला बाळाला जन्म दिला होता. मात्र डिलिव्हरीवेळी बाळाच्या डोळ्याला धारधार शस्त्र लागल्यानं त्याचा मृत्यू झाला. मात्र पन्नास हजाराच आमिष देऊन प्रकरण मिटवा असं निगवे डॉक्टरकडून सांगण्यात आल्याची माहिती चव्हाण कुटुंबीयांनी दिली.
डॉक्टरच्या अमिषाना बळी न पडता उमेश चौहान यांनी शुक्रवारी (27 जुलै) बोईसर पोलीस आणि सरकारी वैद्यकीय अधिकारी यांच्या समोर पुरलेल्या बाळाचा मृतदेह जमिनीतून काढून पोस्टमार्टम करण्यात आलं.
पोस्टमार्टममध्ये नवजात बालकाचा मृत्यू हा डोळ्याजवळ धारदार शस्र लागल्यानेच झाल्याची प्राथमिक माहिती सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे दोषी डॉक्टरवर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे.