SSR Case | रियाच्या कबुली जबाबमुळे सारा अली खान, श्रद्धा कपूरच्या अडचणीत वाढ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग आणि सीमोन खमबाटा यांना चौकशीसाठी समन्स देणार आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्ती तुरुंगात आहे. मात्र तपासमध्ये तिने बॉलीवूडमधील काही नव्या बड्या कलाकारांसह सह एकूण 25 जनांची नावे घेतली आहेत, ज्यांना चौकशीसाठी एनसीबी बोलवण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग आणि सीमोन खमबाटा यांना चौकशीसाठी समन्स देणार आहे. कारण हे सेलेब्रिटी ड्रग्स घेत असल्याची माहिती रियाने एनसीबीला दिली आहे.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास बॉलिवुडच्या काही बड्या कलाकारांसाठी अडचण ठरणार आहे. कारण एनसीबी बॉलिवुडमधील त्या सर्व सेलिब्रिटीजला चौकशीसाठी बोलावणार आहे, ज्यांची नावं रियाने तपास यंत्रणेला दिली आहेत. एनसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या एक ते दोन आठवड्यात काही मोठ्या अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलवलं जाईल ज्यामध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, डिझायनर सीमेन खमबाटा यांची नावं आहेत.
एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘रियाने श्रद्धा कपूर आणि सुशांतसोबत त्याच्या लोणावळा इथल्या फार्म हाऊसवर ड्रग्स घेतल्याचं सांगितलं आहे. तर सारा ही सुशांत सोबत नेहमी पार्टीजमध्ये चरस, गांजा घेत असल्याचीही माहिती रियाने दिली आहे. इतकंच नाही तर सुशांतने स्वःतासाठी काही वेळी साराकडूनही ड्रग्स मागवल्याचा दावा रियाने केला आहे. सीमोन खमबाटासोबत झालेले व्हॉट्सअॅप चॅट्सही सीमोन-रियाचे ड्रग्स कनेक्शन समोर आणतात. या सगळ्या माहितीच्या आधारे चौकशीसाठी या सर्वांना एनसीबी समन्स पाठवणार आहे. तसेच रियाने रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रीसोबत ड्रग्स घेतल्याचीही कबूली एनसीबीला दिली. ज्यामुळे रकुल प्रीत सिंगही चौकशीच्या फेरीत अडकणार आहे.
मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर एनसीबीने 6 जणांना अटक केली. या सहा जणांचे बॉलिवूडमधील अनकांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहेत. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी संबंधित या ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शाविक चक्रवर्ती मुख्य आरोपी आहेत. दोघांनी सुशांतसिंग राजपूत यांच्यासाठी ड्रग्स खरेदी केल्याची कबुली दिली आहे.
संबंधित बातम्या :