एक्स्प्लोर

जळगाववर दु:खाचा डोंगर, एकाच तालुक्यातील 14 भाविकांचा मृत्यू; गावात महिलांनी फोडला टाहो

भारताच्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून 104 लोकांचा एक गट 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता.

जळगाव : महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह (Maharashtra News)  निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये (Nepal Accident)  भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये 31  जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रणगाव, पिंपळगाव, तळवेल, या गावातले सर्व भाविक होते. घटनेची माहिती मिळताच  गावात अतिशय शोकाकूल वातावरण आहे. गावातील भाविक  हे 16 ऑगस्टपासून अयोध्या नेपाळ काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते. 16 ते 28 ऑगस्टपर्यंत असा यांचा प्रवास होतो.एकूण दोन लक्झरी बस नेपाळला गेल्या होत्या. गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून   नातेवाईकांनी टाहो फोडला आहे.

भुसावळमधील 104 लोकांचा गट 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी नेपाळला

भारताच्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून 104 लोकांचा एक गट 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता. हा गट तीन बसमधून प्रवास करत होता आणि त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली. शुक्रवारच्या दिवशी काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत दुर्घटनाग्रस्त झाली. सशस्त्र पोलिस बल कुरिंतरचे प्रमुख माधव प्रसाद पौडेल यांनी सांगितले की, या तीनही बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.

मृतांचे पार्थिव लवकरच महाराष्ट्रात आणणार : देवेंद्र फडणवीस

 राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  तसेच, महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत, असेही फडणवीसांनी ट्विटरद्वारे दिली आहे.  

हे ही वाचा :

जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget