(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neet Result : नीट 2021 परीक्षेचा निकाल आज जाहीर, महाराष्ट्रच्या कार्थिका नायर देशात प्रथम
Neet Result : 16 लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण 8,70,074 विद्यार्थी या परीक्षेच्या कट ऑफ जाहीर झाल्यानंतर प्रवेशास पात्र ठरले आहे.
मुंबई : आज मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रच्या कार्थिका नायर सह तेलंगाणाचा म्रीनल कुट्टेरी आणि दिल्लीच्या तन्मय गुप्ता या तिघांनी देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. 12 सप्टेंबर रोजी NTA (नेशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे देशभरात मेडिकल प्रवेशासाठीची नीट 2021 परीक्षा घेण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास हिरवा कंदील दिल्या नंतर सोमवारी रात्री 8 वाजता हा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला
देशातील 16 लाख विद्यार्थी ज्यांनी ही परीक्षा दिली होती ते विद्यार्थी मागील काही दिवसांपासून परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? याची वाट बघत होते. या 16 लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण 8,70,074 विद्यार्थी या परीक्षेच्या कट ऑफ जाहीर झाल्यानंतर प्रवेशास पात्र ठरले आहे. मागील वर्षी 7,71,500 परीक्षेच्या कट ऑफ जाहीर झाल्यानंतर पात्र ठरले होते.
COP 26 : जागतिक तापमानवाढ जगासाठी धोकादायक, विकसनशील देश अधिक प्रभावित: नरेंद्र मोदी
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नीट 2021 परीक्षेचा कट ऑफ काहीसा घसरलेला पाहायला मिळतोय. UR -EWS कॅटेगरी साठी 50 पर्सेंटाइलचा कट ऑफ 720 - 138 गुणांच्या रेंज मध्ये आहे तर SC, ST, OBC कॅटगिरीसाठी 40 पर्सेंटाइलचा कट ऑफ 146 -113 रेंज मध्ये आहे. त्यामुळे आज निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.
NEET UG - 2021 : नीट परीक्षेचा निकाल जाहीर
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा NEET UG परीक्षा आता पहिल्यांदाच हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये आयोजित करण्यात आली होती.