एक्स्प्लोर

मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण...,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली इच्छा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा लपून राहिली नाही, त्यांनी ती वेळोवेळी व्यक्तही केली आहे. नुकतेच त्यांनी यावर पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे.

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा केली जात आहे. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

जयंत पाटील म्हणाले की, "दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यामुळे मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण सध्याचं संख्याबळ लक्षात घेता ते आता शक्य नाही. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले नाही."

जयंत पाटील पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे."

Gram Panchayat Election Results | जयंत पाटलांच्या सासरवाडीत सत्तांतर; म्हैसाळ ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता

जयंत पाटील म्हणाले की, "मला जसे मुख्यमंत्री व्हावेसे वाटते तसे माझ्या मतदारांनाही मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यात काही चुकीचं आहे असंही नाही. कारण मी शेवटी माझ्या मतदारांना जबाबदार आहे."

सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकच आहेत तसेच मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे किंवा अजित पवार या दोघांपैकी एकाला पाठींबा देण्याची वेळ आल्यास कोणाला पाठींबा देणार या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, "मुळात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना वेगवेगळं समजणं चुकीचं ठरेल. ते एकाच घरातील आहेत."

पक्षाला उभारी देण्यात वाटा भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीचे एकेक शिलेदारांनी पक्षाला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला. अशावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांभाळले. पक्षाच्या पडतीच्या काळात अध्यक्ष शरद पवारांच्या साथीने जयंत पाटलांनी पक्षाला नव्याने उभारी दिली. त्यांनी राष्ट्रवादी काँगेसची सत्ता असताना अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खास मर्जीतले असल्याचं समजलं जातं.

Gram Panchayat Election Results : अजित पवारांचा विजयी उमेदवारांना मोलाचा सल्ला, म्हणाले... जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत ज्या-ज्या वेळी सत्ता आली त्या-त्या वेळी पक्षाला उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं आहे. राष्ट्रवादी पक्षात आतापर्यंत हे पद छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर आर पाटील, अजित पवार यांनी भूषवले आहे. अजित पवार यांना दोन वेळा हे पद भूषवण्याची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पारड्यात उपमुख्यमंत्रीपद पडणार हे निश्चित झाल्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात या पदावरुन रस्सीखेच सुरु होती. यात शेवटी अजित पवारांनी बाजी मारली.

2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीला बहुमत मिळालं. या निवडणुकीत काँग्रेसला 69 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 71 जागा मिळाल्या. काँग्रेसपेक्षा आमच्याकडे जागा जास्त आहेत त्यामुळे मुख्यमंत्रिपद आम्हाला मिळावे अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. पण त्यावेळी काँग्रेसच्या विलासराव देशमुखांनी बाजी मारत मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं.

राष्ट्रवादी पक्षाने आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाचा दावा जास्त ताणलेला नाही. या उलट जास्तीत जास्त महत्वाची खाती आपल्या पदरात पाडून घेणे हेच पक्षाचं धोरण राहिलंय.

कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील

पहा व्हिडीओ: Jayant Patil | मलाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटणारच; मंत्री जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलंCM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget