एक्स्प्लोर

Gram Panchayat Election Results | जयंत पाटलांच्या सासरवाडीत सत्तांतर; म्हैसाळ ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता

गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी जयंत पाटील यांची मेहुणी असणाऱ्या मनोरमादेवी शिंदे या सरपंच म्हणून काम पाहत होत्या. त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दणका बसला आहे. जयंत पाटील यांचे मेव्हणे असणाऱ्या मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. भाजपा गटाने याठिकाणी एक हाती सत्ता मिळवली आहे.

सांगली जिल्ह्यातल्या 152 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सगळ्यात लक्षवेधी निवडणूक ठरली ती मिरज तालुक्यातील म्हैसाळ ग्रामपंचायत. कारण ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सासुरवाडी आहे. म्हैसाळ येथे जयंत पाटलांचे मेहुणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलची गेल्या दहा वर्षापासून सत्ता आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे-म्हैसाळकर गट विरुद्ध राष्ट्रवादीचे मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या पॅनलमध्ये अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली. गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी जयंत पाटील यांची मेहुणी असणाऱ्या मनोरमादेवी शिंदे या सरपंच म्हणून काम पाहत होत्या. या निवडणुकीमध्ये पुन्हा मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्यामध्ये सरपंच मनोरमादेवी शिंदे यांची मुलगी, दिर व अन्य कुटुंबातील सदस्य मैदानात होते. राष्ट्रवादी गटाच्या पॅनलच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा पार पडली होती.

मात्र या निवडणुकीत मंत्री जयंत पाटील यांचे मेव्हणे मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. 17 पैकी 15 जागांवर भाजपा गटाच्या दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला केवळ दोनच जागा या निवडणुकीत मिळाल्या आहेत. विद्यमान सरपंचांसह शिंदे-म्हैसाळकर कुटुंबातील 6 जणांचा पराभव झाला आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Gopichand Padalkar on Jayant Patil: जयंत पाटलांना 40 वर्षात ईश्वरपूरचा रस्ता बांधता आला नाही अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
जयंत पाटलांना 40 वर्षात ईश्वरपूरचा रस्ता बांधता आला नाही अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?
मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Chanakya Niti: तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
Embed widget