Sharad Pawar: गेल्या पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, 3152 मुली बेपत्ता, विरोधी पक्षांची जिथे ताकद तिथेच दंगली सुरू; शरद पवारांची सरकारवर टीका
गेल्या 45 दिवसांपासून मणिपूर जळत आहे, त्या ठिकाणाहून मिळणारी माहिती अतिशय गंभीर असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
Sharad pawar On BJP : गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यातील 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर याच काळात राज्यातील 3,152 मुली बेपत्ता झाल्या, त्यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. देशात ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाची ताकद नाही त्याच ठिकाणी दंगली होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मी खानदेशात गेलो होतो, तिथं लक्षात आलं की कापूस शेतकऱ्यांना घरात ठेवावा लागला आहे. मोदींनी सांगितलं होतं की तीन वर्षात शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करू. पण राज्यातील 391 शेतकऱ्यांनी मागच्या पाच महिन्यात आत्महत्या केली आहे. 23 जानेवारी पासून 23 मे पर्यंत राज्यातील 3 हजार 152 महिला बेपत्ता आहेत. ही चांगली बाब नाही.
Sharad pawar On Manipur Violence: ज्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची ताकद नाही त्या ठिकाणी दंगली
शरद पवार पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यात कोल्हापूर, अकोला, अमळनेर अशा शहरात दंगली झाल्या. सत्ताधारी पक्षाची ताकद जिथं नाही तिथं असे प्रकार सूरू आहेत. राज्यकर्त्याची जबाबदारी आहे की सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण देणे.
मणिपूर प्रश्नी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, मणिपूर मध्ये गेली 45 दिवस झाले दंगल सुरू आहे. त्या ठिकाणाहून मिळणारी माहिती अतिशय गंभीर आहे. एका अधिकाऱ्याने वक्तव्य केलं आहे की मणिपूरमध्ये जे घडत आहे ते गंभीर आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हेच कळत नाही. चीनच्या शेजारी असलेल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे. राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाही.
नरेन्द्र मोदी यांनी स्वतःला संसदेच उद्घाटन करता यावं यासाठी राष्ट्रपती यांना येऊं दिलं नाही. त्यांना जर बोलवलं असतं तर प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतींनी उद्घाटन केलं असतं असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.
या संबंधित बातम्या वाचा: