केवळ दाढी कुरवाळता, काम केलं तरच मी कौतुक करेल; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेना टोला
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलेय.
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. नुस्ती दाढी कुरवाळता, काम केलं की कौतुक करेन, असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. एकनाथ शिंदे म्हणतात की, सतत माझ्यावर तुम्ही टीका करता. तुम्ही काम करत नाहीत, केवळ दाढी कुरवाळत बसतात. काम करा मी कौतुक करेल. गुवाहाटी गोवा फिरुन आलात ते असले धंदे करायला आलात का? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.
12- 12- वीजकपातीतून आम्ही मुक्त केलं तरीही आज वीजकपात का होतं आहे. याचं उत्तर कोण देणार? आज विधानभवनमध्ये योग दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोट्यवधी रुपये यांनी खर्च केले. आता गाड्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिसतात. आता यांना आम्हाला बघायचं नाही तरी का दाखवता ? मला विधानभवनला बोलवलं होत परंतु मी गेलो नाही. वंचित आणि बीआरएसकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रकाश आंबेडकर तेलंगणाला गेले होते. सध्या बीआरएसला त्यांचापेक्षा आपल्या राज्यात जास्त इंटरेस्ट आहे. ते सर्वांना संपर्क साधत आहेत. त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
आपण कुठं कमी पडतो हे लक्षात घ्या. आपण विदर्भात कमी पडतो. अजुनही मुंबईचा अध्यक्ष झालेला नाही. आपल्याला काय कुणाला विचारायला जायचं आहे का? आपण आनंदाचा दिवस साजरा करत असताना चिंतन करायला हवं. आपण भाकरी फिरवायची ठरवली आहे तर ती फिरलीच पाहिजे. ज्याने आता घोषणा दिली त्याच्या वॉर्डत आपला नगरसेवक आहे का? फक्त मोठया घोषणा द्यायच्या, असे अजित पवार म्हणाले.
राज्यात दंगल का घडतेय? त्याचा मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येतं आहे. धाराशिव मध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. एका डॉक्टरचा व्हीडिओ समोर आला आहे. नेमकं काय झालं आहे समोर यायला हवं, असे अजित पवार म्हणाले. पुण्यात कोयता गँग त्रास वाढला आहे. पोलिस यंत्रणा चांगली आहे परंतु सरकार कमी पडत आहे. पोलिसांना मोकळीक मिळत नाही, त्यात हस्तक्षेप वाढत आहे. राज्याला शोभा देणाऱ्या या बाबी नाहीत, असे अजित पवार म्हणाले.
शिवाजीपार्कची सभा झाली त्यावेळी 35 ते 40 शीत आम्ही होतो. त्यावेळी आम्ही ज्युनिअर म्हणून ओळखले जात होतो. या कालावधीत अनेकजण आले आणि सोडून गेले. 25 वर्षांनी नवी पिढी पूढे येत असते. मधल्या काळात भाकरी फिरवली पाहिजे असं सांगितलं. पक्षाने लहानात लहान कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे. बरेच जण मंत्री होतात परंतु स्वतः व्यतिरिक्त इतर आमदार निवडून आणू शकत नाही. त्यांनी काम करायला हवं. भाषणं देउन पहिला नंबर येणारं नाही. परंतु बोलणाऱ्यानी स्वतः काम करायला हवे, असा सल्ला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांना दिला.