Maharashtra Politics ; 'त्या' दोन मोठ्या प्रकरणावर शरद पवार का बोलत नाहीत?
Sharad Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळालं. निवडणूक आयोगानं शिंदेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं.

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या दोन प्रकरणावर स्पष्टपणे बोलत नाहीत. पहाटेच्या शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो गौप्यस्फोट केला त्याविषयी आणि शिवसेनेचे नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडून गेले त्या विषयी... या दोन प्रकरणावर शरद पवार स्पष्टपणे काहीच बोलत नाहीत. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळालं. निवडणूक आयोगानं शिंदेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. यावर शरद पवार म्हणाले….निकालावर चर्चा करता येत नाही. नवीन चिन्ह घ्यायचं….चिन्हाचा फार परिणार होत नाही. निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. शिवसेनेची घटना लोकशाहीविरोधी आहे.. उद्धव ठाकरेंनी पक्षात हुकूमशाही आणली होती. ठाकरेंकडे बहुमत नाही.
आयोगाने हा निर्णय दबावात घेतलाआहे, असा आरोप उद्धव ठाकरेंचा आहे. पण पवार निर्णयाच्या गुणवत्तेवर काहीही बोलत नाहीत. उलट शरद पवार यांनी काँग्रेसचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, काँग्रेसने हात घेतला, लोकांनी मान्य केलं. नवीन चिन्ह मिळेल ते लोकं मान्य करतील.
गेली पाच दशके राज्याच्या राजकारणातल्या प्रत्येक घडामोडींच्या केंद्रस्थानी शरद पवार राहिले आहेत. ती घडामोड पवारांच्या पक्षात असो की दुसऱ्या पक्षात…असे पवार सध्या थेट काही बोलत नाहीत.
पहाटेचा शपथविधी ही पहिली सर्वात मोठी घटना… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच सहमतीने अजित पवार यांच्यासोबतचा शपथविधी झाला होता, असे देवंद्र फडणवीस यांनी सांगून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारचं असू शकतात, असं सांगतिले होते. यापैकी कशावरही पवार काहीही थेट बोलत नाहीत. शरद पवार बोलले तरी बातमी होते. पवार नाही बोलले तरी संभ्रम तयार होतो. त्यामुळे पवार का बोलत नाहीत? यावर वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
निवडणूक आयोगाचा निर्णय भाजपासह सर्वच राजकीय पक्षातील पक्षांतर्गत निवडणुकींवर प्रश्नचिन्ह लावतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयोग ज्या लोकशाही प्रक्रिया सांगतो आहे तसे कांही कुठल्याच राजकीय पक्षात होत नाही. त्यामुळे सर्वच प्रदेशिक पक्ष जे कुटुंब केंद्रीत आहेत, ते बोलणार नाहीत. सकाळच्या शपथविधीवर अधिक चर्चा व्हावी अशी देवंद्र फडणवीस यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच बाकीचे आणखी पुन्हा सांगूच असे ते सांगत आहेत. सकाळचा शपथविधी यात नातेसबंधाचा भाग आहेच.
शरद पवार सकाळचा शपथविधी आणि उध्दव ठाकरेंची पुढची वाटचाल यावर कांहीच बोलणार नाहीत असं नाही…फक्त सध्या ते काही बोलत नाहीत. त्यामुळेच पवार बोलले तरी बातमी होते आणि नाही बोलले तरी संभ्रम कायम राहतो….हे सततच चित्र आजही कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
