एक्स्प्लोर

शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली, राष्ट्रवादीमध्ये दोन कार्यकारी अध्यक्ष 

NCP, Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत मोठी घोषणा आज शरद पवारांनी दिल्लीत केली.

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत मोठी घोषणा आज शरद पवारांनी दिल्लीत केली. पक्षाच्या वर्धापन दिनाचं निमित्त साधत दोन कार्याध्यक्ष नेमले गेलेत..दादा की ताई या प्रश्नाचं उत्तरही यानिमित्तानं पवारांनी दिलंय का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवलीच...राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रथमच कार्याध्यक्ष पदाची घोषणा झाली..आणि एकाचवेळी ती जबाबदारी दोघांवर सोपवली गेली आहे...प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर..त्यामुळे पक्षांतर्गत ज्या भविष्यातल्या वाटचालीची चर्चा सुरु होती, त्यावरच आज पवारांनी शिक्कामोर्तब केलं..राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा स्थापना दिवस साजरा होतोय..आणि त्याच मुहूर्तावर शरद पवारांनी ही घोषणा केली...दोन कार्याध्यक्ष नेमताना दोघांवर जी जबाबदारी दिलीय तीही महत्वपूर्ण आहे...राज्यांची जबाबदारी देताना महाराष्ट्र हे राज्य सुप्रिया सुळेंकडे असणार आहे. 

राष्ट्रवादीत कुठल्या कार्याध्यक्षांकडे काय जबाबदारी

प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा आणि राज्यसभा कामकाजाची जबाबदारी असणार आहे..सोबत आर्थिक घडामोडींचे अध्यक्षही म्हणून त्यांना जबाबदारी आहे. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला, युवा, विद्यार्थी संघटना आणि लोकसभेच्या कामकाजाची जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे केंद्रीय निवडणूक अधिकार समितीच्या अध्यक्षही असणार आहेत.  साहजिकच महाराष्ट्रातल्या निर्णयांमध्ये यानिमित्तानं सुप्रिया सुळेंचा अधिकार चालताना दिसू शकतो. 

 आज ही घोषणा होत असताना सगळ्यात विशेष गोष्ट होती..सुप्रिया सुळेंची अनुपस्थिती, आणि अजित पवार मात्र दिल्लीत होते..एरव्ही क्वचितच दिल्लीत दिसणारे अजितदादा आज या कार्यक्रमासाठी होते तर ताई मुंबईत होत्या.. त्यांच्या नेहमीच्या भूमिकांमधला हा बदल जाणवणारा होता...त्यामुळे दादांनी दिल्लीत त्यावेळी हजर असावं ही नेपथ्यरचना जाणीवपूर्वक केली गेली होती का असाही प्रश्न आहे. 

या मोठ्या घोषणेवेळी व्यासपीठावरचे अजितदादा मात्र नंतर माध्यमांशी काही न बोलताच निघून गेले. नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राष्ट्रवादीनं गमावला आहे, साहजिकच नव्या कार्याध्यक्षांपुढचे आव्हान खडतर आहे. 2 मे ते 10 जून...गेल्या महिनाभराचा कालखंड राष्ट्रवादीत प्रचंड घडामोडींचा राहिला आहे. शरद पवारांनी त्यावेळी राजीनामा तर मागे घेतला..पण सोबत वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोन कार्याध्यक्ष नेमत भविष्यातल्या नेतृत्वाची दिशाही स्पष्ट केलीय. 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget